युगांडा : युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवनी यांची जीभ बोलताना भलतीच घसरली. बोलता बोलता त्यांना आपण काय बोलतो याचा विसर पडला आणि ते चक्क 'ओरल सेक्स'वरच घसरले. ते म्हणाले, तोंडाचा उपयोग हा खाण्यासाठी असतो, 'ओरल सेक्स'साठी नाही. गेल्या काही दिवसांत देशाबाहेरील लोक देशात आल्यामुळे ही चुकीची पद्धत समाजात पसरत असल्याचेही मुसेवनी म्हणाले.


राष्ट्रपतींनी दिला कडक इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती मुसेवनी यांनी आपल्या भाषणात देशातील नागरिकांना उद्देशून म्हटले की, 'मी आपणा सर्वांना जाहीररित्या इशारा देऊ इच्छितो की, की आपणास वाईट पद्धती बंद करायला हव्यात. या वाईट पद्धतींपैकीच एक म्हणजे ....  काय म्हणता तुम्ही त्याला? ओरल सेक्स. ध्यानात घ्या की, तोंडाचा वापर हा खाण्यासाठी करायचा असतो. सेक्ससाठी नाही.' राष्ट्रपती योवेरी मुसेवनी यांनी हे विधान केले खरे. पण, त्यानंतर ते समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) जोरदार चर्चेचा विषय ठरले. समाजमाध्यमांतून त्यांचा विधान करतानाचा हा व्हिडिओही भलताच ट्रोल झाला.


समलैंगिक संबंध गंभीर गुन्ह्याच्या कक्षेत


दरम्यान, युगांडाच्या राष्ट्रपतींनी असे वादग्रस्त विधान करणे किंवा विचित्र कारणांसाठी बंदी घालणे ही काही पहिलीच वेळ नाही. यापुर्वीही त्यांनी २०१४ मध्ये समलैंगिक संबंध ठेवण्याविरूद्ध कडक कायदा बनवला होता. त्यांनी समलैंगिकता हा प्रकार गंभीर गुन्ह्याच्या यादीत टाकला. इतकेच नव्हे तर, समलिंगी लोकांची माहिती न देणाऱ्या व्यक्तिलाही गुन्हेगाराच्या कक्षेत आणून ठेवले.



दरम्यान, असे असले तरी, 'ओरल सेक्स'बाबत मुसेवनी यांनी केलेल्या विधानाची सोशल मीडियावर मात्र जोरदार खिल्ली उडवण्यात आली.