तेल हवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन दिवसीय ऐतिहासिक इस्त्रायल दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. इस्त्रायल आणि भारताच्या बड्या कंपन्यांच्या सीईओच्या संयुक्त परिषदेला संबोधित करतील. त्यानंतर हैफा शहरात असणाऱ्या पहिल्या महायुद्धात मृत्यू पावलेल्यांच्या स्मारकाला आदरांजली वाहून आपला दौरा संपवतील. दुपारनंतर मोदी जर्मनीला रवाना होतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्यापासून जर्मनीतल्या हॅमबॅर्गमध्ये जी 20 देशांची महत्वपूर्ण बैठक सुरू होते आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. इस्त्रायलच्या अत्यंत भरगच्च दौऱ्यानंतर जी 20 देशांच्या बैठकीत आणि त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरही मोदींचा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. जगातल्या सगळ्या आर्थिक, राजकीय सत्ताकेंद्रांचे प्रमुख या बैठकीत सामील होत आहेत. त्यामुळे बैठकीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे.