नायपिदॉ : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमारची राजधानी नायपिदाँ इथं दाखल झाले आहेत. म्यानमारचे अध्यक्ष यू. थीन क्याव यांच्यासोबत मोदींनी लष्कराची मानवंदना स्वीकारली. म्यानमारमध्ये चीनचा हस्तक्षेप वाढत असताना पंतप्रधानांची ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.


विशेष म्हणजे, चीनसोबत द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केल्यानंतर लगचेच मोदी म्यानमारला आले आहेत. राखीन प्रांतात रोहिग्य मुस्लिम दहशतवाद्यांच्या हिंसाचाराची भारतानं सुरू केलेल्या काही विकास प्रकल्पांना थेट झळ पोहोचू शकते. यासंदर्भातही पंतप्रधान म्यानमारच्या नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.