नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये शाही मान सोडण्याचा निर्णय प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी अभिनेत्री मेगन मर्केल यांनी घेतला आहे. यामध्ये रॉयल हाइनेस (royal highness) आणि सार्वजनिक निधी (Public Fund) या गोष्टींचा वापर प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या पत्नी करू शकणार नाही. बकिंघम पॅलेस (Buckingham Palace) मध्ये 18 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या निर्णयात शाही कुटुंबाचे सदस्यता सोडल्यानंतर या सुविधांचा लाभ घेता येणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बकिंघम पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी वसंत ऋतूत नवीन व्यवस्था लागू केली जाणार आहे. ज्यामध्ये प्रिन्स हॅरी आणि मेगन यांचे शाही कुटुंबातीस सक्रिय सदस्यत्व कमी करण्यात आले आहे. आता ते फक्त ड्यूक ऑफ ससेक्स हॅरी आणि डचेस ऑफ ससेक्स (Duke and Duchess of Sussex) मेगनच्या रुपात ओळखले जाणार आहे. त्या दोघांना 'हिज रॉयल हाइनेस' आणि 'हर रॉयल हाइनेस' या पदवीचा वापर करता येणार नाही. हॅरी राजकुमार आणि ब्रिटिश शाही गादीचे सहावे वारसदार आहेत. (....म्हणून पत्नीसह प्रिन्स हॅरीचा राजघराण्यापासून दुरावा?) 


 


महाराणी एलिझाबेथ द्वितीयकडून जाहिर केलेल्या माहितीनुसार, त्यांनी आनंदाने आपला नातू आणि त्यांच्या कुटुंबियांना आपला रस्ता निवडण्याची संधी दिली आहे. हॅरी, मेगन आणि अर्ची कायमच माझ्या कुटुंबाचे प्रिय सदस्य असतील असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. तसेच हॅरी आणि त्यांच कुटूंब कॅसल स्थित असलेल्या घराच्या डागडुजीकरता वापरण्यात आलेल्या 24 लाख देखील परत करणार आहेत. माध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या चर्चा आणि सुत्रांच्या माहितीचा आधार पाहता मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्या राजघराण्यापासून दूर जाण्याच्या या निर्णयामागे फक्त आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं हे  एकच कारण नसू शकतं असं म्हटलं जात आहे. प्रिन्स हॅरी आणि त्याच्या मोठ्या भावामध्ये गेल्या वर्षी काही मतभेद झाल्याचं कळत आहे.