Prince Harry Testifies Against Aabloid Aublisher: ब्रिटनचे राजकुमार हॅरी आपल्या राजेशाही कर्तव्यांपासून दूर आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी मेगन मार्कल यांनी राजघराण्यापासून स्वत:ला दूर ठेवत आपल्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रित केले आहे. राजघराण्यात झालेल्या अनेक गैरप्रकारांबद्दल प्रिन्स हॅरी उघडपणे बोलताना दिसत आहेत. आपल्या 'स्पेअर' या पुस्तकातूनही त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे त्यामुळे सध्या सगळ्यांचेच लक्ष त्यांच्याकडे वेधले आहे. त्याचसोबत आपल्या भावासोबतही आपले अनेक हवेदावे असल्याचे त्यांनी अनेक मुलाखतीतून सांगितले आहे. सोबत आपल्या पत्नीला, मेगन मार्कल यांना वर्णभेदाचा सामना करावा लागत होता याबद्दलही त्यांनी सांगितले. आता या सर्व चर्चा सुरू असताना प्रिन्स हॅरी यांनी नुकताच धक्कादायक खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या ब्रिटनच्या वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, प्रिन्स हॅरी यांनी एका टॅब्लॉईड वृत्तपत्राच्या विरोधात कारवाईसाठी कोर्टाची दारं ठोठावली आहेत. त्याबद्दल त्यांनी पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या वृत्तपत्रातील पत्रकारांविरोधात त्यांनी कोर्टात त्याबद्दल साक्ष दिली आहे. प्रिन्स हॅरीबद्दल आत्तापर्यंत जे काही लिहून, छापून आलं आहे त्यासाठी हॅकिंग केले गेले, असं त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांचे व्हॉईसमेल्सही हॅक झाले आहेत. त्याबद्दल त्यांनी आपल्यावर छापून आलेली सर्व माहिती कोर्टात सादर केली आहे. मंगळवारी प्रिन्स हॅरी हे कोर्टात हजर होते. ते टीनएजर असताना त्यांच्याबाबतीत हे सर्व प्रकार घडल्याचे त्यांनी कबूल केले आहे. 


हेही वाचा - UPSC परीक्षा सोडून झाला अभिनेता! अपघात झाला, वजन वाढलं; आज सिंगल फादर म्हणून जगतोय आयुष्य


हा सगळा प्रकार झाल्यानंतर, माझा आता कोणावरही विश्वास नाही, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे. 1997 च्या ऑगस्टमध्ये प्रिन्स हॅरी यांची आई प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू हा फॉटोग्राफरनं त्या रात्री त्यांचा प्रियकरासोबतचा फोटो टिपण्यासाठी त्यांचा पाठलाग करत होते आणि त्यांच्या अपघातालाही मीडिया आणि फोटोग्राफर्सना दोषी धरण्यात आले होते. मे महिन्यात प्रिन्स हॅरी यांचे वडील प्रिन्स चार्ल्स हे किंग चार्ल्स III झाले. त्यांचा मोठा राज्याभिषेक सोहळा इंग्लंडमध्ये पार पडला. त्यामुळे त्यांच्या या सोहळ्याला प्रिन्स हॅरी कुठे होते असा प्रश्नही वर्तमानपत्रांमध्ये फिरू लागला होता. त्यामुळे त्याचीही बरीच चर्चा झाली. 


प्रिन्स हॅरी हे गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. ते आपलं म्हणणं आणि आपल्या मुद्दे ठळकपणे आणि बिनधास्तपणे मांडताना दिसत आहेत. त्यामुळे ते स्पॉटलाईटमध्ये वारंवार असतात. त्यांच्या या खुलेपणानं व्यक्त होण्यावरही त्यांचे जनमानसात कौतुक होताना दिसते आहे.