मुंबई : महागाई वाढली म्हणून आपण सतत बोंब ठोकत असतो. पण या ठिकाणी तर महागाईने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. या ठिकाणचे वस्तूंचे दर ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने एक योजना तयार केली आहे. पण ही योजना नक्की काम करेल का? हा प्रश्नच आहे. 


महागाई वाढली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निकोलस माडुरोच्या सरकारने आपल्या मुद्रा बोलीवारचे नाव बदलून सॉवरेन बोलीवार ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषच्यानुसार, यावर्षी व्हेनेजुएलाच्या महागाईचे दर १० लाखाने वाढले आहेत. अर्थतज्ञांनुसार, यामुळे व्हेनेजुएलाची परिस्थिती खराब होण्याची शक्यता आहे.


नोटा बदलणार


देशातील मुद्रा बदलणारा हा निर्णय आहे. नोटांची नावे बदलली गेली आहेत आणि त्याचबरोबर ८ लाख नव्या नोटा देखील सुरु केल्या आहेत. या नोटा २, ५, १०, २०, ५०, १००, २०० आणि ५०० च्या आहेत.
व्हेनेजुएला सेंट्रल बॅंकचे प्रमुख कॅलिक्स्टो ओर्टेगोने घोषणा केली आहे की, जुन्या नोटा काही काळ चलनात राहतील. फक्त १००० च्या नोटा चलनातून बाहेर करण्यात येतील. काही अर्थशास्त्रज्ञ दुधाच्या एक कप कॉफीला महागाईचे प्रतिक मानत आहेत. ३१ जुलैला राजधानी कराकसच्या कॅफे हाऊसमध्ये एक कप कॉफी २५ लाख बोलिवार मध्ये मिळत आहे. पाच आठवड्यांपूर्वीच्या किंमतीत ही किंमत दुप्पट आहे. 


राष्ट्रपतींचे ट्वीट


व्हेनेजुएल्यातील महागाईमुळे नोटांची मागणी वाढली आहे. पण बॅंकांनी सर्व ग्राहकांना आपल्या अकाऊंटमधून पैसे काढण्यावर मर्यादा घातली आहे. अशावेळेस नवी आर्थिक योजनातून महागाईवर मात करण्यास आणि आर्थिक युद्धाचा सामना करण्यास मदत होईल. राष्ट्रपती माडुरो यांनी ट्वीट करुन सांगितले की, सरकार नवउदार पूंजीवादची योजना अपयशी करेल. देशाची आर्थिक व्यवस्था आता संपूर्ण होईल. 


अर्थशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, मजुरी वाढल्याने महागाई वाढेल. आता नव्या नोटा लॉन्च करण्यात येतील. पण माडुरोने बॅंकांसाठी सुट्टी जाहीर केली आहे. फक्त बॅँकाच नाही तर वित्तीय संस्थांसाठी २४ तासा इलेक्ट्रॉनिक पेमेंटही बंद केले जाईल. 


वस्तूंच्या किंमती-


2.4 किलोग्राम चिकनची किंमत- एक कोटी 46 लाख बोलिवार (सुमारे 2.22 डॉलर)
एक टॉयलेट रोलची किंमत- 26 लाख बोलिवार
गाजर- 30 लाख बोलिवार
तांदूळ- 25 लाख बोलिवर
 सॅनेटरी पॅडचे पॅकेट- 35 लाख बोलिवार
एक किलो मटण- 9 लाख बोलिवार
एक किलो टॉमेटो- 50 लाख बोलिवार
एक किलो चीज- 75 लाख बोलिवार