टेक्सास : प्राध्यापक डॉ. हेन्री मुसोमा हे टेक्सासमधल्या ‘ए अँड एम’ विद्यापीठात शिकवतात. त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या कडेवरचे  लहान मुलं हा कुतूहलाचा विषय ठरत आहे. हे काही महिन्यांचे मुलं त्यांच्या अॅस्टन रॉबिनसन या विद्यार्थिनीचे असून आपल्या छोट्या बाळाला सांभाळत इतर काम करणं तिच्यासाठी फार मुश्कील होतं. म्ह्णून आपल्या विद्यार्थिनीचे अभ्यास बुडू नये या काळजीपोटी माणुसकी दाखवत त्यांनी तिच्या चिमुकल्याला कडेवर घेत विद्यार्थांना शिकवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या बाळाला सांभाळायला कोणी मिळत नाही म्हणून तिने कॉलेजला न जाण्याचा निर्णय घेतला आणि ईमेल करून प्राध्यापकांना तसे कळवले. दुसरं कोणी त्याकडे दुर्लक्ष केलं असतं किंवा या सबबी नेहमीच्या आहेत, असं म्हणत दुर्लक्ष केलं असतं. पण प्राध्यापक हेन्रींनी माणुसकी दाखवत तिला बाळाला घेऊन कॉलेजला येण्यास सांगितले आणि बाळाला डेवर उचलून घेत हेन्रीनीं विद्यार्थ्यांना शिकवलं. त्यांच्या या निर्णयाचं कौतुक करावं तितकं थोडचं.  


यावर अॅस्टन म्हणते, ‘माणूसकी आणि शिक्षणाचं महत्त्व जाणणारा प्राध्यापक मी कुठेच पाहिला नाही. मुलाला सांभाळून शिक्षण घेणं खूप कठीण आहे. पण या जगात हेन्रीसारखे प्राध्यापक आहेत आणि त्यांच्यामुळेच मी शिकू शकते, याचं मला आनंद आणि समाधान आहे.’