नवी दिल्ली : म्यानमारनं हजारो स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुस्लिमांना परत देशात घेण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती बांग्लादेशच्या परदेश मंत्र्यांनी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्यानमारच्या एका वरिष्ठ प्रतिनिधिशी संवाद साधल्यानंतर बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री एएच महमूद अली यांनी ही माहिती दिलीय. 


गेल्या काही आठवड्यांत हजारोंच्या संख्येनं रोहिंग्या मुस्लिमांनी भीतीच्या वातावणामुळे बांग्लादेशात आसरा घेतलाय. 


दोन्ही देशांत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आणि मैत्रीपूर्ण संभाषणानंतर रोहिंग्या शरणार्थिंना पुन्हा देशात घेण्याचा प्रस्ताव म्यानमारनं दिल्याचं महमूद अली यांनी म्हटलंय.