तरारखेल :  पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या जुलमी राजवटीविरोधात जनतेनं मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या तरार खेल या भागामध्ये हे आंदोलन उसळलं. आंदोलनात महिला आणि लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान लष्कर आणि पाकिस्तान सरकारकडून सातत्याने नागरिकांचा आवाज दडपला जातोय. नागरिकांच्या हत्या आणि हिंसाचाराविरोधात अखेर नागरिकांनी आवाज उठवलाय. गेल्या सत्तर वर्षांपासून इस्लामाबाद सातत्याने इथे दडपशाही करत असल्याबाबत नागरिकांत इथे रोष आहे. अनेक राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी या आंदोलना सहभागी झाले आणि त्यांनी पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या.