Python Attack on Alligator Crocodile Video: सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. या प्लॅटफॉर्मवर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. यात प्राण्यांचे व्हिडीओ म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण. कारण वन्यप्राण्यांच्या जीवनशैलीबद्दल कायम कुतुहूल असतं. त्यामुळे वन्यप्राण्याचे व्हिडीओ वेगाने व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओत एका अजगराने सुसरवर हल्ला केल्याचं दिसत आहे. त्यामुळे या लढाईत नेमकं कोण जिंकलं? याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ पाहताना तुमच्या अंगावर नक्कीच शहारा येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओत एका अजगराने सुसरभोवती वेटोळे घातल्याचं दिसत आहे. सुसरला गिळण्याचा अजगराचा प्रयत्न दिसत आहे. दुसरीकडे आपला जीव वाचवण्यासाठी सुसर प्रयत्न करताना दिसत आहे. पण या लढाईत नेमकं कोण जिंकलं? याचा अंदाज बांधणं कठीण आहे. सुसर अथक प्रयत्नानंतर अजगराची पकड सोडवण्यास यशस्वी ठरते. त्यानंतर अजगराला ही शिकार करणं कठीण असल्याचं कळतं आणि लढाई सोडून पळ काढतो. 



हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म यूट्यूबर शेअर केला आहे. आतापर्यंत 8 कोटीहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. तसेच नेटकरी व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.