नवी दिल्ली : इंडोनेशियामध्ये एका महिलेला अजगराने जिंवत गिळलं यानंतर महिलेला अजगराचं पोट कापून बाहेर काढण्यात आलं. रिपोर्ट्सनुसार महिला शेतीत काम करत असतांना अजगराने महिलेवर हल्ला केला. शुक्रवारी गावकऱ्यांना  7 मीटरहून लांब अजगराच्या पोटातून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. 54 वर्षीय महिला वा तिबा असं या महिलेचं नाव होतं. बुधवारी महिला घरी परत न आल्याने कुटुंबियासोबत गावकऱ्यांनी देखील महिलेचा शोध सुरु केला. 


स्थानिक पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. अजरगाची स्थिती पाहिल्यानंतर अजगरानेच महिलेला गिळल्याचा संशय आला. त्यानंतर अजगरला मारुन त्याच पोट कापून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सामान्यपणे अजगर छोट्या प्राण्यांची शिकार करतात. माणसाची शिकार होण्याच्या घटना तशा खूप कमी असतात. पण येथे मोठ्या प्रमाणात साप आणि अजगर आढळतात.