मुंबई : गेल्या काही दिवासांपासून ब्रिटनमध्ये एकाच गोष्टीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. ही गोष्ट म्हणजे Queen's Platinum Jubilee. अर्थात राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राज्यारोहणाची सत्तरी. (Queen Elizabeth II platinum jubilee Prince Harry and Meghan Markle booed by crowd watch video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणीच्या राज्यारोहण सोहळ्यासाठी जिथं मोठ्या संख्येनं सर्वसामान्यांनीसुद्धा हजेरी लावली होती, तिथेच राजघराण्यातील बऱ्याच मंडळींनीही या सोहळ्यासाठी हजेरी लावली. 


या शाही सोहळ्यासाठी प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल (Prince Harry and Meghan Markle) यांचीही हजेरी पाहायला मिळाली. काही वर्षांपूर्वीच या जोडीनं लग्नानंतरच अवघ्या काही दिवसांत शाही कुटुंहबातून काढता पाय घेतला होता. 


संपूर्ण जगाचं लक्ष वेधणारी ही घटना सर्वांच्याच भुवया उंचावून गेली. काळ लोटला आणि पुन्हा एकदा मेगन- प्रिन्स हॅरी एका शाही सोहळ्यामध्ये आल्याचं सर्वांनीच पाहिलं. जवळपरास दोन वर्षांनंतर मेगन आणि हॅरी यांना शाही कुटुंबासमवेत पाहिलं गेलं होतं. 


St Paul's Cathedral च्या समोरच जेव्हा वाहनांत्या ताफ्यातील एका कारमधून मेगन आणि प्रिन्स हॅरी उतरले तेव्हा त्यांना लोकांच्या अनपेक्षित प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. 


एकिकडे त्यांच्या येण्यानं आनंदाच्या किंकाळ्या सुरू होत्या. तर, दुसरीकडे मात्र त्यांच्या येण्यानं खिल्ली उडवली जाण्याचे सूर सर्वाधिक ऐकायला मिळाले. प्रिन्स हॅरी यांनी मात्र मोठ्या मनानं समोर असणाऱ्या जनसमुदायाकडे हात उंचावत प्रत्येक प्रतिक्रियेचा स्वीकार केला. 


कुटुंबापासून काहीसे दूर मेगन- प्रिन्स हॅरी 
लहानपणापासून एकत्र दिसणारे प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हॅरी यावेळी एकमेकांपासून काहीसे दूर दिसले. जिथं संपूर्ण शाही कुटुंब एका बाजूला होतं, तिथेच मेगन आणि प्रिन्स हॅरी मात्र काहीसे वेगळे दिसले. 



दोन्ही भावांमध्ये कोणत्याही प्रकारचा संवादही झाला नाही, याचवेळी शाही कुटुंबात असणारी दरी संपूर्ण जगानं पाहिली. पण, कार्यक्रमाच्या निमित्तानं का असेना, प्रिन्स हॅरी आणि मेगन यांना कुटुंबासमवेत पाहून अनेकांना आनंदही होता.