Queen Elizabeth II Son King Charles III : महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी 8 सप्टेंबर 2022 रोजी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या निधनाचं वृत्त वायुवेगानं जगभरात पसरलं. तिथं शाही कुटुंबातही घडामोडींना वेग आला आणि महाराणी एलिझाबेथ यांचे ज्येष्ठ पुत्र प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे राज्यकारभार आणि सिंहासनाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्या क्षणापासून ते संपूर्ण जगासमोर किंग चार्ल्स (King Charles III ) म्हणून वावरू लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंग चार्ल्स आणि त्यांच्या स्वभावाविषयी यापूर्वी खूपकाही सांगितलं गेलं. अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्याविषयीच्या गोष्टींनी बऱ्याचजणांच्या भुवयाही उंचावल्या. आता याच नव्या राजाचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जिथं एका क्षुल्लक कारणावरून त्यांच्या संतापाचा पारा वर जातना दिसत आहे. (Queen Elizabeth II son King Charles III gets annoyed because of leaked ink pen watch video)


पाहा : Queen Elizabeth II : राणी एलिझाबेथ यांची लेक एकेकाळी होती सौंदर्याची खाण


सूत्रांच्या माहितीनुसार एकाच आठवड्यात समारंभागदरम्यान रागावरील नियंत्रण सुटण्याची ही त्यांची पहिलीच वेळ. एके ठिकाणी भेट दिली असता तिथं असणाऱ्या अभिप्रायाच्या वहीत आपलं मत लिहिताना पेन बिघडलं आणि त्याची शाई राजाच्या हातावर आली. बस्स... ते उठले आणि संतापाची सुरुवात झाली. 


सुरुवातीला किंग चार्ल्स तारीख विसरले, त्यानंतर शाईमुळं झालेली फजिती... पुढच्याच क्षणाला “Oh god I hate this (pen)!" असं म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चिडलेल्या स्वरातच त्यांनी पत्नी, Camilla यांच्याकडे तो पेन दिला. 


“I can’t bear this bloody thing … every stinking time." असं म्हणत त्यांनी हात पुसण्यास सुरुवात केली. पुढचे काही सेकंद ते तिथं थांबले आणि तिथून पुढच्याच क्षणाला निघूनही गेले. 



अद्यापही राणीवर अंत्यसंस्कार झालेला नाही. अशा परिस्थितीत सातत्यानं माध्यमांच्या नजरेत असणाऱ्या किंग चार्ल्स यांच्या अशा वागण्यावरून सध्या बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.