Queen Elizabeth II : राणी एलिझाबेथ यांच्या हातात दिसणारी चिमुकली लेक; एकेकाळी होती सौंदर्याची खाण

Queen Elizabeth II Daughter : भल्याभल्या अभिनेत्रींनाही लाजवेल असं होतं, प्रिंसेस अॅन यांचं सौंदर्य 

Updated: Sep 14, 2022, 09:19 AM IST
Queen Elizabeth II : राणी एलिझाबेथ यांच्या हातात दिसणारी चिमुकली लेक; एकेकाळी होती सौंदर्याची खाण  title=
know more about Queen Elizabeth IIs only daughter Princess Anne see photos

Queen Elizabeth II daughter princess anne : जवळपास सात दशकांहून अधिक काळ ब्रिटनच्या राजघराण्याचं सर्वोच्च पद भुषवणाऱ्या अर्थात ब्रिटनच्या सिंहासनावर विराजमान असणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II ) यांनी काही दिवसांपूर्वीच अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 96 व्या वर्षी राणीनं जगाचा निरोप घेतला. ज्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी प्रासादातून बाहेर येत श्रद्धांजली देण्यासाठी आलेल्यांची भेट घेत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. शाही कुटुंबातील या सदस्यांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधलं ते म्हणजे राणीच्या मुलीनं, अर्थात प्रिंसेस अॅन (Princess Anne ) यांनी. 

दु:खद प्रसंगी घातल्या जाणाऱ्या पोषाखामध्ये प्रिंसेस अॅन यांनी आपल्या भावंडांसह (King Charles III ) आईच्या पार्थिवामागोमाग प्रवास केला. यावेळी संपूर्ण जगाच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. 15 ऑगस्ट 1950 रोजी अॅन यांचा जन्म झाला होता. 

लहानपणापासूनच त्यांनी आपल्या आईप्रमाणे शाही कुटुंबाच्या (Royal Family) चालिरितींप्रती ओढ व्यक्त केली. शिवाय आईप्रमाणेच त्यांचा कलही घोड़ेस्वारी आणि शिकारीकडे दिसून आला. 1987 मध्ये त्यांना Princess Royal ही पदवी देण्यात आली. (know more about  Queen Elizabeth IIs only daughter Princess Anne see photos)

(Horse riding) घोडेस्वारीत लखलखती कारकिर्द 
प्रिंसेस अॅन या तारुण्यावस्थेत इतक्या सुंदर होत्या, की भल्याभल्या अभिनेत्री आणि विश्वसुंदरीही त्यांच्या सौंदर्यापुढे फिक्या पडत होत्या. 1971 मध्ये त्यांनी  European Eventing Championship मध्ये बाजी मारली होती. त्याच्याच पुढच्या वर्षी म्हणजेच 1976 मध्ये त्यांनी Mark Phillips यांच्याशी लग्न केलं होतं. 

1976 मध्ये त्यांनी ऑलिम्पिक (olympic games) खेळांमध्ये ब्रिटनचं प्रतिनिधीत्वंही केलं होतं. पण, पदकाशिवाय परतल्यानंतर त्यांनी या क्षेत्रातून काढता पाय घेतला. 1992 मध्ये घटस्फोटाचा सामना करण्याऱ्या प्रिंसेस अॅन यांनी पुढे नौदल अधिकारी, राणी एलिझाबेथ यांचे माजी अधिकारी Timothy Laurence यांच्यासोबत सहजीवनाची सुरुवात केली. 

पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या खेळात आपली वेगळी ओळख तयार करण्यापासून ते शाही कुटुंबातील एक मेहनती आणि होतकरु व्यक्तीमत्त्वं म्हणून अॅन नावाजल्या जातात. आई,  Queen Elizabeth II यांच्या निधनानंतर आता त्यांच्या या लेकिवर नेमकी कोणती जबाबदारी असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.