मुंबई : ब्युटी प्रॉडक्ट्सच्या जाहिरातींना अजिबाज भुलू नका... तुम्ही जसे दिसता, त्यावरही प्रेम करा..... हे सांगतेय सुदानची मॉडेल न्याकीम गेटवेच... 'क्वीन ऑफ डार्क' या नावानं ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्याकीम ही सुदानची मॉडेल... तिनं सौंदर्याची परिभाषाच बदलून टाकलीय. मॉडेलिंग किंवा ग्लॅमर वर्ल्डमधला गोऱ्या किंवा उजळ कांतीच्या लोकांचा दबदबा तिनं मोडून काढलाय. २४ वर्षांची न्याकीम ही जन्मतःच काळ्या कुळकुळीत रंगाची... आजही गोऱ्या कातडीवरच जास्त प्रेम करणारं हे जग.... 'क्रीम आणि पावडर लावून गोरे व्हा' असं सांगणारी ही दुनिया.... याच जगात न्याकीम अत्यंत आत्मविश्वासानं वावरते, तेसुद्धा ग्लॅमरच्या जगात... सुदानमधली ती अत्यंत यशस्वी मॉडेल आहे.



'शरीर ब्लिच करायला आवडेल?'


न्याकीम इन्स्टाग्रामवर अॅक्टिव आहे... ती ब्लॅक आहे, ब्युटीफुल आहे आणि बोल्डही आहे.... तिला सतत तिच्या काळेपणावरुन टोमणे ऐकावे लागतात. 'तुला तुझं पूर्ण शरीर ब्लीच करायला आवडे का?' असा प्रश्न नुकताच तिला एका टॅक्सी ड्रायव्हरनं विचारला होता.



तिच्या काळ्या शरीरामुळे तिला विविध प्रश्नांचा आणि वेगळ्या नजरांचा सामना करावा लागतो.... लहानपणापासूनच न्याकीमला तिच्या रंगामुळे विचित्र अनुभव आले. पण न्याकीम या सगळ्याला पुरून उरली... 'मला माझ्या या मेलानिन त्वचेचा अतिशय अभिमान आहे..... मला कितीही पैसा मिळाला आणि संधी मिळाली, तरी मी माझा रंग बदलणार नाही' असं ती ठामपणे सांगते... उलट हे 'डार्क कॉम्प्लेक्शन' म्हणजे देवानं मला दिलेला आशीर्वाद आहे, असं ती म्हणते...  आज न्याकीम सुदानमधली एक यशस्वी मॉडेल आहे... आत्मविश्वास कसा असावा, याचं न्याकीम हे उत्तम उदाहरण आहे.