त्या चुकीमुळे राहुल गांधी सोशल नेटवर्किंगवर ट्रोल
राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
बर्कले : राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. इंडिया अॅट ७० रिफ्लेक्शन्स ऑन द पाथ फॉरवर्ड या विषयावर राहुल गांधी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, बर्कलेमध्ये राहुल गांधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी बातचित करत असताना राहुल गांधींनी केलेल्या चुकीमुळे त्यांच्यावर सोशल नेटवर्किंगवर निशाणा साधण्यात आला.
लोकसभेमध्ये खासदारांची संख्या ५४५ असताना राहुल गांधी ही संख्या ५४६ असल्याचं म्हणाले. संसदेमध्ये खासदारांची संख्या सम कशी असू शकते असं म्हणत राहुल गांधींना सोशल नेटवर्किंगवर ट्रोल करण्यात आलं.
राहुल गांधींच्या या कार्यक्रमामध्ये एका मुलीनं गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला. राहुल गांधींना कोणते प्रश्न विचारायचे हे जर तुम्ही नियंत्रीत करणार असाल तर हा मुक्त संवाद कसा, असा सवाल या मुलीनं विचारत आरडाओरडा केला. पण मुलीच्या या गोंधळानंतरही कार्यक्रमामध्ये कोणतीही बाधा आली नाही.