Rahul Gandhi: मोदी सरकारच्या `या` 2 योजनांचं राहुल गांधींकडून थेट Cambridge विद्यापीठात कौतुक
Rahul Gandhi Cambridge Speech: राहुल गांधी यांनी नुकताच अमेरिकेतील केंम्ब्रीज विद्यापिठामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी राजकीय विरोधक असलेल्या पंतप्रधान मोदींच्या सरकारने लागू केलेल्या दोन योजनांचं कौतुक केलं.
Rahul Gandhi Praises Modi Government: काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) धोरणावर टीका करताना दिसतात. फारच कमी वेळा किंवा अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या वेळाच राहुल गांधींनी मोदींचं कौतुक केलं असेल. मात्र ब्रिटनमधील केम्ब्रीज विद्यापिठामध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. राहुल गांधींनी मोदी सरकारच्या दोन धोरणांचं कौतुक केलं. विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी मोदी सरकारने लोकांची बँक खाती उघडून देण्याच्या आणि महिलांसाठी उज्ज्वला योजना लागू करण्याच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे.
या दोन योजनांचं केलं कौतुक
जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असलेल्या केम्ब्रीजमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधींना मोदी सरकारसंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला. मोदी सरकारच्या अशा काही योजना आहेत का ज्यांचा सर्वसामान्य भारतीयांना फायदा झाला आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राहुल गांधींनी दोन योजनांचा आवर्जून उल्लेख केला. महिलांना मोफत गॅस सिलेंडर देणारी उज्ज्वला योजना आणि लोकांची बँकांमध्ये खाती उघडून घेण्याची (जन-धन) योजना अगदी उत्तम होत्या, असं राहुल गांधींनी म्हटलं. मात्र याचवेळी राहुल गांधींनी मोदींच्या वैचारिक धोरणावर टीकाही केली. ते त्यांचे विचार भारतीयांवर लादू पाहत आहेत. मात्र हे विचार कोणी स्वीकारणार नाही. तुम्ही एकाच प्रकारचा विचार लोकांवर थोपवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यावर लोक व्यक्त होणारच, असंही राहुल म्हणाले.
विरोधक तणावात
राहुल गांधींनी असा दावा केला आहे ते त्यांच्याबरोबरच इतर अन्य नेत्यांच्या फोनमध्ये पेगासेस स्पायवेअर होतं. गुप्तचर अधिकाऱ्यांनी स्वत: आपल्याला फोनवरुन बोलताना सावधान राहण्याचा सल्ला दिला होता. माझ्या फोनवरील संवाद रेकॉर्ड केले जात होते, असंही राहुल म्हणाले. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधींच्या व्याख्यानाचा व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केला आहे. राहुल गांधींनी आम्ही विरोधी पक्ष म्हणून सतत एका प्रकारच्या तणावामध्ये आहोत, असं सांगितलं. आमच्याविरोधात गुन्हे दाखल केले जात आहे. माझ्याविरोधात असे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जे गुन्हेगारी स्वरुपाचे अजिबातच नाहीत, असंही राहुल म्हणाले.
विरोधकांनी केलेला हेरगिरीचा आरोप
मागील वर्षी एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमाने पेगासेस स्पायवेअरचा वापर करुन भारतामधील 300 हून अधिक प्रतिष्ठित व्यक्तींचे फोन नंबर टॅब करण्यात आले होते. हे सर्व नंबर संभाव्य टार्गेटच्या यादीमध्ये होते. यामध्ये अनेक नेते, पत्रकारांचाही समावेश होता. यानंतर काँग्रेसबरोबरच विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत आणि संसदेबाहेर याविरोधात आक्षेप नोंदवत हेरगिरेचे आरोप केंद्रातील सरकारविरोधात केले होते.