Indian Railways Knowledge: पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतात मग रेल्वे इंजिनमध्ये डिझेल कुठून भरलं जातं तुम्हाला माहितीये?
Railways Knowledge : चारचाकी किंवा दुचाकीमध्ये पेट्रोल-डिझेल भरायचे असेल तर पेट्रोल पंपावर जावे लागते. पण तुम्हाला माहिती आहे का? रेल्वेच्या इंजिनमध्ये डिझेल भरायचे असेल तर त्यासाठी ट्रेन पेट्रोल पंपावर घेऊन जावी लागते की आणखी काही विशेष मार्ग आहे.
Indian Railways : दररोज कोट्यावधी भारतीय त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी रेल्वेने (railway) प्रवास करतात. परंतु बहुतेक लोकांना भारतीय रेल्वे किंवा ट्रेनशी संबंधित काही मनोरंजक माहिती माहित नसते. जर चारचाकी किंवा दुचाकीमध्ये पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel) भरायचे असेल तर पेट्रोल पंपावर ( petrol pump) जावे लागते. पण तुम्हाला माहिती आहे का? रेल्वेच्या इंजिनमध्ये डिझेल भरायचे असेल तर त्यासाठी ट्रेन पेट्रोल पंपावर घेऊन जावी लागते की आणखी काही विशेष मार्ग आहे. जाणून घ्या याची सविस्तर माहिती...
पेट्रोल पंपावर नाहीतर येथे इंजिनमध्ये डिझेल भरले जाते
डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांना इंधन भरण्यासाठी विशिष्ट पेट्रोल पंप (petrol pump) किंवा यार्डमध्ये नेण्याची गरज नाही. हे सर्व काम रेल्वे स्टेशनवरच केले जाते. ट्रेनच्या इंजिनमध्ये डिझेल भरण्यासाठी रुळांजवळ एक पाइपलाइन केली जाते. जिणेकरुन गाडी तिथे उभी करुन डिझेल भरले जाते. पंप लावण्यासाठी एक स्टील बॉक्स तयार केलेला असतो. डिझेल भरण्याची जबाबदारी दिलेल्या कर्मचाऱ्याकडे याची चावी असते.
डिझेलच्या टँक जवळ एक मापक
बॉक्स ओपन केल्यानंतरही पंप चालू करण्यासाठी लागणारे विशेष औजार केवळ त्याच कर्मचाऱ्याजवळ असते. ज्या प्रमाणे सामान्य वाहनांमध्ये पाइट लावून डिझेल भरले जात तसेच ट्रेनमध्येही डिझेल भरले जाते. डिझेलच्या टँक जवळ एक मापक असते ज्यावरून किती डिझेल भरलंय हे कळते.
वाचा: Google Pay, Paytm किंवा Phonepe वापरत असाल तर 'ही' बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल...
कुठे भरले जाते डिझेल...
ज्या स्थानकावरून ट्रेन सुरू होणार आहे, त्या स्थानकावरील ट्रेनमध्ये डिझेल भरले जाते. ट्रेनच्या डिझेल टाकीची क्षमता 6 हजार लिटर आहे. ती ट्रेन जर कमी अंतर कापण्यासाठी जात असेल तर साधारणपणे एकाच वेळी त्यात भरलेले तेल पुरेसे असते. पण जर ती एकापेक्षा जास्त स्थानकांवर धावणार असेल तर तिची डिझेल टाकी वाटेतही भरली जाते.
ट्रेन किती मायलेज देते
ट्रेनचे इंजिन किती मायलेज देते. हे गाड्यांमधील डबे आणि त्यांचा वेग यावर अवलंबून आहे. 12 डब्यांची एक्स्प्रेस ट्रेन जात असेल तर तिचे इंजिन 4.5 लिटर डिझेलमध्ये फक्त 1 किमी धावेल. दुसरीकडे, जर एखाद्या पॅसेंजर ट्रेनला 24 डबे असतील तर ती ट्रेन 6 लिटर डिझेलमध्ये फक्त 1 किमी धावेल. याचे कारण एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पुन्हा पुन्हा ब्रेक लावण्याची गरज नाही आणि डिझेलही कमी लागते.