व्हाईट हाऊसमध्ये भारतीय वंशाचे `राज`
डोनाल्ड ट्रम्प यांचे सहाय्यक मुख्य प्रसारमाध्यम सचिव म्हणून नेमणूक झाल्यानंतर शाह यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली.
अमेरिका : व्हाईट हाऊसचा चेहरा म्हणून इतिहासात प्रथमच एक भारतीय वंशाची व्यक्ती मीडियासमोर आलीये. राज शाह असं त्यांचं नाव आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे सहाय्यक मुख्य प्रसारमाध्यम सचिव म्हणून नेमणूक झाल्यानंतर शाह यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली.
'राज' यांची स्तुती
व्हाईट हाऊसमधल्या प्रसिद्ध जेम्स एस. ब्रँडी पत्रकार कक्षामध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेपूर्वी शाह यांच्या बॉस आणि प्रसारमाध्यम सचिव सारा सँडर्स यांनी त्यांची तोंड भरून स्तुती केली.
सर्वोच्च स्थानी
ट्रम्प प्रशासनातले सर्वात हुशार आणि सर्वोत्तम अधिकारी असल्याचं सँडर्स म्हणाल्या.
३३ वर्षांचे शाह हे व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी विभागात आतापर्यंत सर्वोच्च स्थानी पोहोचलेले भारतीय वंशाचे अधिकारी ठरलेत...