Life on Mars : मंगळ ग्रहावर मानवी वस्ती विकसीत करण्यात लवकरच संशोधकांना यश येणार आहे. मगंळ ग्रहावर उंदीर  जिवंत राहू शकतात. पृथ्वीवर झालेल्या संशोधनात  संशोधकांनी हा मोठा खुलासा केला आहे. मंगळ ग्रहाबाबत अनेक रहस्य उवगडण्यात संशोधकांना यश आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिली आणि अर्जेंटिनामधील अटाकामा पर्वतरांगाचा परिसर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अत्यंत कोरडा  आणि शुष्क असा झाला आहे. या शिखरावर शास्त्रज्ञांना काही उंदीर सापडले आहेत. येथील वातावरण आणि कमी तापमानामुळे अटाकामा पठार परिसर मंगळासारखाच मानला जाते. ज्वालामुखीच्या शिखरावर संशोधन करताना येथे संशोधकांना उंदीर दिसले आहेत. यावरुनच उंदरासारखे सस्तन प्राणी मंगळावर राहू शकतात असा दावा संशोधकांनी केला आहे.


अटाकामा परिसर समुद्रसपाटीपासून 6,000 मीटर उंचीवर 


ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेला अर्जेंटिनामधील अटाकामा पर्वतरांगाचा परिसर समुद्रसपाटीपासून 6,000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर आहे. अशा ठिकाणी संस्तन प्राण्यांचे अस्तित्व असूच शकत नाही असा दावा करण्यात आला होता.  या परिसरात संशोधन करताना संशोधकांना उंदराचे सांगाडे सापडले आहेत. यामुळे येथील वातावारणात उंदीर जिवंत राहू शकतात हे संशोधनातून उघड झाले आहे. अमेरिकन प्रोफेसर जे स्टॉर्झ आणि त्यांचे सहकारी गिर्यारोहक मारियो पेरेझ मामानी यांच्या टीमने हे संशोधन केले. 2020 च्या सुरुवातीस चिली-अर्जेंटिना सीमेवर ज्वालामुखी असलेल्या Llullaillaco च्या 22,000 फूट शिखरावर उंदीरांचे अस्तित्व असल्याचे पुरावे सापडले होतो. याआधी एवढ्या उंचीवर एकही सस्तन प्राणी आढळला नव्हता. 


अतिशय खडतर वातावरणात जिवंत राहू शकतात उंदीर


उंदरासारखा सस्तन प्राणी ज्वालामुखीच्या शिखरावर जिवंत राहू शकतो तर मंगळ ग्रहा सारख्या वातावरणात देखील ते राहू शकतात.  अमेरिकेतील नेब्रास्का युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर स्टॉर्ज  यांच्या टीमने येथील खडकांचे संशोधन केले. यावेळी येथील शिखरावर त्यांना उंदराचे सांगाडे आढळले. यानंतर सर्व ज्वालामुखीच्या शिखरांचे पद्धतशीरपणे संशोधन केले.  6,000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या 18 ज्वालामुखीसह 21 ज्वालामुखीय शिखरांचे परीक्षण करण्यात आले. यावेळी 6,000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या अनेक ज्वालामुखीच्या शिखरांवर 13 उंदरांचे सांगाडे सापडले. दोन ज्वालामुखीच्या शिखरावर सापडलेले मृत उंदरांचे अवशेष काही दशके जुने असल्याचे रेडिओकार्बन डेटिंगवरून दिसून आले.
 उंदीर मंगळ ग्रहासारख्या वातावरणात जिवंत राहू शकतात
या शिखरावर सापडलेल्या उंदरांच्या अवशेषांचे संशोधन करण्यात आले. येथील वातावरण हे मंगळ ग्रहाशी मिळते जुळते आहे. खडकाळ आणि बर्फाळ प्रदेशता हे प्राणी जिवंत राहू शकतात. येथे तापमान कधीही शून्यापेक्षा जास्त नसते आणि येथे ऑक्सिजन खूपच कमी असते. यामुळे   मंगळ ग्रहासारख्या वातावरणात उंदीर जिवंत राहू शकतात असा दावा संशोधकांनी केला आहे.