मुंबई : घरात एकच उंदीर दिसला तर लोक अस्वस्थ होतात. उंदीर घरात घाण तर करतातच पण त्यासोबत घरातील अनेक वस्तूंचं नुकसान देखील करतात. खाण्याव्यतिरिक्त ते कपडेही कापतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे उंदीर केळीला घाबरतात. कारण केळीमध्ये एक विशेष प्रकारचे रसायन असते. त्यामुळे उंदीर तेथून पळून जातात. संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांना असे दिसले की, उंदरांमध्ये स्ट्रेस हार्मोन्स आढळतात. त्यामुळे उंदीर चिंतेत होतात. या वस्तुस्थितीबद्दल जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उंदीर केळीला का घाबरतात?


सायन्स अॅडव्हान्सेस (Science Advances) या जर्नलमध्ये एक संशोधन आले आहे, ज्याचे प्रमुख लेखक जेफ्री मोगिल आहेत.  वर्जिन नर उंदीर हे मादी उंदरांच्या पिलावर आक्रमन करण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या म्हणण्यानुसार, संशोधनात त्यांना असे आढळून आले की, उंदीर मुलांना वाचवण्यासाठी विशेष काम करतात. या आक्रमकतेपासून बचाव करण्यासाठी उंदीर हे रसायन आपल्या शरीरातून लघवीद्वारे बाहेर टाकतो. या रसायनाचा वास घेतल्यानंतर नर उंदीर त्यापासून दूर जातात. संशोधनादरम्यान असे आढळून आले की, केळ्यामध्येही असेच रसायन आढळते. या रसायनाचा वास घेतल्याने उंदरांवर ताण येतो.


केळीच्या सुगंधाने उंदीर अस्वस्थ झाले. शास्त्रज्ञांनी याची पुष्टी करण्यासाठी केळीचे तेल घेतले, ज्याचा वास अगदी उंदराच्या मूत्रासारखा होता. हे तेल त्यांनी कापसात टाकून उंदरांच्या पिंजऱ्यात ठेवले. त्यानंतर, उंदरांना त्याचा वास येताच, उंदरांच्या लघवीच्या जवळ येणा-या उंदरांप्रमाणेच त्यांची तणावाची पातळीही मोठ्या प्रमाणात वाढली. विशेष म्हणजे हा ताण कुमारी नर उंदरांमध्ये जास्त वाढला होता, याचा अर्थ केळीचा वास जर उंदरांच्या जवळ पोहोचला तर नर उंदीर त्या ठिकाणी राहू शकणार नाहीत.