Nostradamus Predictions 2023: अडॉल्फ हिटलरच्या उदयापासून ते त्याचा अंत होईपर्यंत आणि जपानवरील अणुबॉम्ब हल्ला, प्रिन्सेस डाएनाचा मृत्यू (Princess diana), 9/11 हल्ले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंतच्या इंदाज वर्तवलेल्या सर्व भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आणि अनेकांनीच नॉस्त्रेदमस या व्यक्तीच्या भाकितांवर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. नॉस्त्रेदमस यांनी केलेल्या बहुतांश भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आणि आता सध्या सुरु असणाऱ्या दिवसांबाबतही त्यांनी जेक काही सांगितलंय त्यामुळं हादराच बसत आहे. कारण, त्या घटना रोखणं कुणालाच शक्य नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॉस्त्रेदमस यांच्या भविष्यवाणी... 
नॉस्त्रेदमस यांनी 1566 मध्ये निधनापूर्वी 6338 भविष्यवाणी लिहिल्या होत्या. यामध्ये जगाचा अंत केव्हा होणार याबाबतही सांगितलं गेलं होतं. फक्त धडकी भरवणाऱ्याच भविष्यवाणी नव्हे, तर काही मन प्रसन्न करणाऱ्या गोष्टीही त्यांनी नमूद केल्या होत्या. नॉस्त्रेदमस यांनी केलेल्या असंख्य भविष्यवाणींपैकी टॉप 5 गोष्टींवर आपण आज नजर टाकणार आहोत. 


Russia Ukraine War: रशियाकडून सीमा भागात अण्वस्त्रवाहू लढाऊ विमानं तैनात, ज्याची भीती होती तेच.... 


 


तिसरं विश्वयुद्ध 
नॉस्त्रेदमस यांच्या प्रोफेसीज पुस्तकात लिहिलंय, सात महिने युद्ध आणि वाईट कामांनी लोकांचे मृत्यू... या ओळीचा संदर्भ अनेकजण तिसऱ्या विश्वयुद्धाशी जोडू पाहत आहेत. अनेक अनुयायांच्या मते रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine war) पडलेली युद्धाची ठिणगी तिसऱ्या महायुद्धामध्ये परावर्तित होऊ शकते. काहीजण याचा संदर्भ अमेरिका- उत्तर कोरिया किंवा अमेरिका- रशिया (America Russia) युद्धाशी जोडत आहेत. 2023 मध्ये हे युद्ध पेटी शकतं अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. 


मंगळावर प्रकाश
मंगळ ग्रहाविषयीसुद्धा नॉस्त्रेदमस यांनी भविष्यवाणी केली आहे. मंगळावर प्रकाशाचा स्त्रोत दिसेल असं त्यात म्हटलं गेलं आहे. (Mars light)


पोप बदलतील... 
ख्रिस्तधर्मात महत्त्वं असणारे पोपही बदलतील असं नॉस्त्रेदमस यांनी भविष्यवाणीत सांगितलं होतं. असं झाल्यास फ्रान्सिस यांच्याऐवजी कुणी दुसरं पोप असेल. पोप फ्रान्सिस हे जगातले शेवटचे विश्वासार्ह पोप असतील. त्यांची जागा जे कुणी घेईल त्यामुळं एक घोटाळा उघडकीस येईल. 


अधिक वाचा : चीनमध्ये हुकूमशाही! बीजिंगमध्ये 14 लाख जणांना अटक


नॉस्त्रेदमस यांनी केलेल्या या भविष्यवाणी पाहता तुमच्याही पायाखालजी जमीन सरकेल. पण, त्यांनी यामध्ये काही सकारात्मक गोष्टींचीही नोंद केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे 2022 मध्ये आरोग्य आणि उपचार क्षेत्रात प्रगती होईल. यामुळं नागरिकांचं आयुर्मान वाढेल. इतकंच काय, की नॉस्त्रेदमस यांच्या भविष्यात दावा केल्यानुसार माणसं 200 वर्षे जगतील.