पॅलेस्टाईनमध्ये खेळली जातेय `रियल PUBG`, इस्रायलच्या सैनिकांचा सर्जिकल स्ट्राईक, थरकाप उडवणारा Video
Israel Palestine Conflict : इस्त्रायलच्या सैन्याने हमासला देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अशातच पॅलेस्टाईनच्या भागात इस्त्रायली सैनिकांनी (Israeli Air Strike) राडा घातल्याचं समोर आलंय.
Real PUBG in Palestine Video : इस्रायल, हमास यांच्यातील युद्ध (Israel Palestine Conflict) आणखी तीव्र झालाय. युद्धात आतापर्यंत जवळपास 1200 जणांचा मृत्यू झालाय. हमासनं (Hamas Attack) इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायल सैन्यानेही गाझा पट्टीतील हमासच्या अड्ड्यांना लक्ष्य केलं आहे. या युद्धात हिज्बुल या दहशतवादी संघटनेनं एन्ट्री करत इस्रायलवर हवाई हल्ले केले. त्यानंतर आता इस्त्रायलच्या सैन्याने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्याचा एक धक्कादायक व्हिडीओ (Viral Video) आता समोर आला आहे.
गाझा पट्टीतून हमास आणि लेबेनॉनच्या सीमेकडून हिज्बुल्लाह असे हल्ले सुरू झाल्यामुळे इस्रायल एकाचवेळी दोन फ्रंटवर लढाई लढतोय. दोन्ही बाजूंचे आत्तापर्यंत 1200 हून अधिक लोक ठार झालेत असा दावा करण्यात येतोय. सैनिकांसह नागरिकांचा बळीही मोठ्या प्रमाणात जात आहे. तर हजारो लोक जखमी झालेत. इस्रायल हमास युद्धाचे पडसाद अमेरिकेत उमटलेत. वॉशिंग्टन शहरात इस्रायल समर्थक आणि हमास समर्थक आपआपसात भिडले. अशातच पॅलेस्टाईनच्या भागात इस्त्रायली सैनिकांनी (Israeli Air Strike) राडा घातल्याचं समोर आलंय.
आणखी वाचा - Israel Attack : थरारक कामगिरी करणारं Mossad 'हमास'समोर का ठरतंय फेल?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये खऱ्या खुऱ्या पबजी गेमची (Real PUBG) झलक पहायला मिळत आहे. इस्त्रायली सैनिकांनी पॅरेशूटच्या (Israeli Air strike With Parachutes) मदतीने गाझाच्या भागात लँडिंग केली अन् हमासवर हल्लाबोल केला. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दिसतंय की, इस्त्रायली सैनिक मोठमोठ्या बिल्डिंगवर लँडिंग करत आहेत. आकाशात पक्षांचा थवा नाही तर सैनिक उडत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
पाहा VIDEO
दरम्यान, इस्रायल, हमास युद्धात इस्रायलमध्ये 18 हजार भारतीय अडकलेत. भारतीय नागरिक दुतावासाच्या संपर्कात आहेत आणि ते सुखरुप असल्याचं समजतं. या युद्धात अनेक परदेशी नागरिक ठार झाले असल्याची माहिती भारतातील इस्रायलचे राजदूत नोर गिलोन यांनी दिलीय. मात्र, ठार झालेल्या परदेशी नागरिकांमध्ये भारतीयांचा उल्लेख नाही. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय अधिकारी, पर्यटक, व्यापा-यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत.