नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाची गणनाही आता जगातील भयानक देशांमध्ये होईल की काय असे वाटू लागलेय. कारण गेल्या काही महिन्यांपासून तेथील अनेक ठिकाणी बेडरुम, टॉयलेय तसेच कारमध्ये साप आढळल्याच्या घटना समोर आल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता तिथे असं काही घडलंय की ज्यामुळे सगळेच हैराण झाले. ऑस्ट्रेलियाच्या एका फायर फायटरच्या हेल्मेटमध्ये साप लपून बसला होता. न्यू साऊथ वेल्सच्या रुदरफोर्ड फायर स्टेशनमधील एका फायर फायटरच्या हेल्मेटमध्ये साप लपला होता. 


हा हेल्मेट घालण्याआधी त्या फायर फायटरने हेल्मेट तपासून पाहिला असता त्याला तेथे साप दिसला. दरम्यान सर्पमित्रांना बोलवून तो साप ताब्यात घेण्यात आला.



याचा व्हिडीओ फेसबुकवर 'फायर आणि रेस्क्यू एनएसडब्लू'ने पोस्ट केलाय. यात सर्पमित्र हेल्मेटमधून सापाला बाहेर काढताना दिसतोय. जसा तो साप हेल्मेटमधून बाहेर आला त्याला लगेचच ताब्यात घेण्यात आला.