Rediscover Lost Black-Naped Pheasant Pigeon: पृथ्वीवर मनुष्य प्राण्यापासून जीवजंतूपर्यंत एक अन्नसाखळी आहे. प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे. असं असलं तरी गेल्या काही वर्षात अनेक प्राणी आणि त्यांच्या जाती लुप्त होत आहेत. या प्रजातींचं संवर्धन करण्यासाठी जगभरातील तज्ज्ञ मंडळी प्रयत्न करत आहेत. असं असताना दुर्लभ नारंगी कबूतराचं दर्शन झाल्याने आश्चर्याचा धक्का बसला आहे. नारंगी कबूतराचं शेवटचं दर्शन 1882 मध्ये झाल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजेच 140 वर्षानंतर नारंगी कबूतर दिसलं आहे. हे कबूतर पापुआ न्यू गिनीच्या फर्ग्युसन आयलँडवर दिसलं असून कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. या कबूतरला ब्लॅक-नेप्ड-पीसँट पीजन (Black-naped Pheasant Pigeon) असं बोललं जातं. औवो असं स्थानिक नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारंगी कबूतरांची नोंद लुप्त झालेल्या पक्षांच्या श्रेणीत केली होती. मात्र स्थानिक लोकांना 2019 पक्षी दिसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून या पक्ष्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. ही कबूतरं कुठे गेली होती? आणि कसे परत आले? हा संशोधनाचा विषय असल्याचं कॉर्नेल लॅब ऑफ ऑरनिथोलॉजीचे रिसर्चर जॉर्डन बोर्समा यांनी सांगितलं आहे. पण दुर्मिळ पक्षी पुन्हा दिसल्याने त्यांनी आनंद देखील व्यक्त केला आहे. 



बातमी वाचा- FIFA WC: बियरसाठी दारोदारी फिरणाऱ्या फॅन्सना अरबपती शेखनं नेलं महालात, आणि...


कॉर्नेल लॅब ऑफ ऑरनिथोलॉजीचे रिसर्चर जॉर्डन बोर्समा यांनी आपल्या टीममध्ये स्थानिक शिकारी ऑग्स्टीन ग्रेगरी यांचा समावेश केला होता. पापुआ न्यू गिनीचं फर्ग्युसन आयलँडमध्ये घनदाट जंगल आहे. या जंगलात माणसाचा वावर नाही. त्यामुळे पक्षी अभियानात अडचणी येत होत्या. मात्र महिनाभराच्या मेहनतीनंतर यश हाती लागलं आहे.