Neeta Ambani : देशातील सर्वात प्रभावी आणि यशस्वी महिलांच्या यादीत नाव येणाऱ्या नीता मुकेश अंबानी यांनी कायमच आपलं वेगळेपण जपलं आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नीता अंबानी यांचा प्रवास पाहून अनेकांनाच हेवा वाटतो. धनाढ्य उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी, नीता अंबानी त्यांच्या राहणीमानासोबतच स्टाईल स्टेटमेंट आणि त्यांची अनोखी निवडही नेहमीच लक्ष वेधते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबानींच्या पत्नीची आणखी एक गोष्ट जी सर्वांचं लक्ष वेधते ती म्हणजे त्यांच्या आवडीचं सुट्टीचं एक ठिकाण. सुट्टीच्या निमित्तानं एखाद्या ठिकाणी भटकंतीसाठी जायचं म्हटलं की, नीता अंबानी कायमच स्विस आप्ल्स (Swiss Alps) ला पसंती देतात. अल्ट्रा लक्झरी जीवनशैलीसाठी अर्थात विचारही करता येणार नाही, इतक्या आलिशान राहणीमानासाठी ही जागा ओळखली जाते. इथं जगभरातील श्रीमंत लोक सुट्टीसाठी येतात.  


स्विस आल्प्स (Swiss Alps) अर्थात स्वित्झर्लंड मध्य युरोपातील एक पर्वतीय देश आहे, जिथं कैक तलाव, गावं आणि उंचच उंच पर्वतं आहेत. पाईन वृक्षांचं अच्छादन असणाऱ्या या वृक्षांवरून भुरभुरणारा बर्फ जेव्हा खाली येतो आणि मध्येच अडकतो तेव्हा हे दृश्य पाहण्यालायक असतं. स्विस आप्ल्स पर्वतरांगा स्वित्झर्लंडमधील मोठा भाग व्यापतात. 


अंबानी कुटुंबासोबत नीता अंबानी इथं कायमच येत असतात. इथं त्या कुटुंबासमवेत बर्जनस्टॉक रिजॉर्ट (Burgenstock Resort) इथं राहतात. सूत्रांच्या माहितीनुसार येथील प्रेसिडेंन्शिअल सुईटची किंमत एका रात्रीसाठी 28,000 अमेरिकी डॉलरपासून सुरू होते. तर रॉयल सुईटची किंमत 46000 अमेरिकी डॉलर इतकी आहे. म्हणजेच नीता अंबानी इथं मुक्कामासाठी तगडा खर्च करतात. भारतीय चलनानुसार इथं एका दिवसाचं भाडं  62,21,232 रुपये इतकं सांगितलं जात आहे. 


हेसुद्धा वाचा : देवभूमीत दहशत; धडकी भरवणारा रहस्यमयी आवाज, मागोमाग धरणीकंप... विचित्र घटनांनंतर अख्खं गाव रिकामं​


स्विस आप्ल्स हे ठिकाण जगातील सर्वात उंच पर्वतरांगांसाठी ओळखला जातो. इथंच मोंट ब्लांक (Mont Blanc) नावाचं एक पर्वत आहे. ज्याची उंची समुद्रसपाटीपासून 4,804 मीटर म्हणजेच 15,774 फूटड इतकी आहे. अतिशय महागड्या ठिकाणांपैकी एक असणाऱ्या या ठिकाणी एकदातरी भेट द्यावी असं भटकंतीची आवड असणाऱ्या अनेकांनाच वाटतं. काय मग, तुम्हालाही आवडलं का हे ठिकाण?