Mukesh Ambani News : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या मुकेश अंबानी यांनी आता त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा सर केला आहे. फक्त भारतातील नव्हे, तर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या मुकेश अंबानी यांचं नाव अतिशय महत्त्वाच्या यादीमध्ये समाविष्ट झालं असून, जागतिक स्तरावर भारतासाठी आणि खुद्द अंबानींसाठीसुद्धा ही अतिशय महत्त्वाची आणि कौतुकास्पद बाब ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतासह आशिया खंडातील श्रीमंत व्यक्ती म्हणून नावलौकिक मिळवलेल्या मुकेश अंबानी यांनी ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2024 मध्ये जगभरातील कैक व्यक्तींमधून दुसरं स्थान पटकावलं आहे. ब्रँड फायनान्सच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या या यादीमध्ये त्यांना हे मानाचं स्थान मिळालं आहे. या यशासह मुकेश अंबानी आंनी बड्या उद्योजकांना ब्रँड गार्डियनशिपच्या बाबतीत पिछाडीवर टाकलं आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि गुगलचे सीसीओ सुंदर पिचाई यांच्याही नावाचा समावेश आहे. या यादीमध्ये पहिल्या स्थानावर टेनसेंटच्या  हुआतेंग मा यांचं नाव आहे. (Brand Guardianship Index 2024 )


कोणत्या निकषांच्या आधारे मिळतो हा बहुमान? 


कर्मचारी, गुंतवणुकदार आणि समाजाच्या गरजा लक्षात घेत हितचिंतकांचाही विचार करत संतुलित व्यावसायिक मूल्यांचा विचार करणाऱ्या उद्योजकांना या निकषांच्या आधारे या यादीत समाविष्ट करण्यात येतं. या यादीमध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पाचवं स्थान मिळालं आहे. मागील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये ते आठव्या स्थानावर होते. त्यांच्या मागोमाग महिंद्रा अँड महिंद्राचे अनिश शाह (सहावं स्थान) आणि इन्फोसिसच्या सलील पारेख (16 वं स्थान) यांचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मुकेश अंबानी यांचं नाव या यादीच मागच्या वर्षीही दुसऱ्याच स्थानावर होतं. 


हेसुद्धा पाहा : चिंता वाढवणारी बातमी; मार्च महिन्यातच तापमान 40 अंशांचा आकडा गाठणार? 


मुख्य यादीत दुसऱ्या स्थानी असणारे मुकेश अंबानी यंदाच्या वर्षी 'डायवर्सिफाइड' गटामध्ये पहिल्या स्थानावर आहेत. हे स्थान पटकावताना त्यांनी चक्क एलन मस्क, टिम कुक, सुंदर पिचाई, सत्या नडेला यांच्यावर मात केली आहे. उपलब्ध माहितीनुसार साधारण 109 अब्ज डॉलर्स इतकं वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या वाट्याला आलेला हा आणखी एक बहुमान खरंच हेवा वाटण्याजोगा आहे, नाही का...!