वॉशिंग्टन: कोरोना व्हायरसचे(COVID-19) सर्वाधिक रुग्ण असलेली अमेरिका सध्या संकटात सापडली. या पार्श्वभूमीवर शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना अमेरिकेला एक मदत करण्याची विनंती केली. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत हा जगातील प्रमुख औषध उत्पादक देशांपैकी एक आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामध्ये कोरोनाच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या hydroxychloroquine या गोळीचाही समावेश आहे. भारताने या औषधाची निर्यात बंद केल्याने साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारात या गोळीसह औषधांचा तुटवडा जाणवत आहे.


धावणं विसरलेली मुंबापुरी लॉकडाऊनमध्ये अशी दिसतेय...

मात्र, आता भारताने अमेरिकेन कंपन्यांकडून देण्यात आलेली hydroxychloroquine गोळ्यांची ऑर्डर पूर्ण करावी, असे ट्रम्प यांनी मोदींना सांगितले. मोदींनी ट्रम्प यांची ही विनंती मान्य केल्याचे समजते. एवढेच नव्हे तर आपणदेखील या गोळीचे सेवन करणार असल्याचे ट्रम्प यांनी मोदींना सांगितले. 


५ एप्रिलला कम्प्यूटर, पंखे, एसी, फ्रिज बंद करण्याची गरज नाही : केंद्रीय उर्जा मंत्रालय

hydroxychloroquine या गोळीचा वापर सहसा मलेरियाच्या रुग्णांवरील उपचारासाठी केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांत कोरोनावर ही गोळी प्रभावी ठरत असल्याची बाब पुढे आली होती. त्यामुळे जगभरात या औषधाची मागणी वाढली आहे. 

दरम्यान, अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा ३,०१,९०२ इतका झाला आहे. आतापर्यंत ८,१७५ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोनाचे तब्बल २३ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत.