Mystery Solve Underwater City Off The Coast Of Greece : संपूर्ण जग हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. जगातील अशात एका मोठ्या रहस्याचा संशोधकांनी उलगडा केला आहे. ग्रीसमध्ये पाण्याखाली गुडूप झालेले 375 वर्ष जुने रहस्यमयी शहर संशोधकांनी सोदून काढले आहे. दगडांनी बनवलेले फूटपाथ आणि मध्यभागी मोठा गोल आकार. तसेच 20 खांबांचा पाया रचना असलेले अवशेष सापडले आहेत. दगडाचे हे मोठे स्लॅबची रचना प्राचीन इमारतींच्या मजल्यांसारखी दिसत आहे. हे ग्रीस मधील अत्यंत प्राचीन शहर असल्याचा संशोधकांचा दावा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रीसमधील झाकिन्थॉस येथे समुद्राखाली हे पाण्यात बुडालेले प्राचीन शहर सापडले आहे. अनेक वर्षांपासून हे शहर पाण्याखाली दडलेले आहे. पाण्याखालील दडलेल्या या प्राचीन शहराचा शोध लागला आहे. हे शहर  375 वर्षे जुने असल्याचा दावा केला जात.  हे शरह पाण्यात कसे बुडाले या रहस्याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही. 


अटलांटिक महासागराच्या मध्यभागी एक हरवलेला खंड सापडला होता. त्या अनुषंगाने संशोधक संशोधन करत होते. 375 वर्षांपासून हा परिसर गायब होता. 2013 मध्ये झाकिन्थॉसच्या किनाऱ्यावर रहस्यमयी अवशेष सापडले होते. यानंतर थेट समुद्रात या शहराचा शोध सुरु करण्यात आला. संशोधनादरम्यान पाण्याखाली हे शहर पहिल्यांदा सापडले. आयोनियन बेटांमधील हा तिसरा सर्वात मोठा समुद्रकिनारा आहे. त्याचे नाव ग्रीक पौराणिक कथेवरून ठेवण्यात आल्याचे समजते. इंडिपेंडेंट यूकेने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालानुसार, झाकिन्थॉसमधील एलिकानासच्या खाडी परिसरात काही अवशेष सापडले होते, जे 30 एकरांपेक्षा जास्त परिसरात पसरले होते. हे अवशेष समुद्रसपाटीपासून दोन ते सहा मीटर खोलवर होते. येथे दगडांनी बनवलेले फूटपाथ तसेचमध्यभागी मोठा गोल आकार असलेला 20 खांबांचा पाया आढळला. दगडाचे हे मोठे स्लॅब प्राचीन सार्वजनिक इमारतींच्या मजल्यांसारखे होते. यावरुन या शहराच्या रचनेचा अंदाज लावला जात आहे. 


अवशेष 5000 वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा 


पुरातत्वशास्त्रज्ञांनी या अवशेषांचे सखोल संशोदन केले. हे अवशेष एखाद्या प्राचीन इमारतीचा भाग असू शकतात, ज्याबद्दल कोणालाही माहित नव्हते. मात्र यामागचे गूढही आता उकलले आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन नमुने गोळा केले. हे अवशेष कोणत्या रहस्यमयी शहरांचे नसून 5000 वर्षांपूर्वी नैसर्गिकरित्या काँक्रीटचे बनलेले आहेत. खनिजे आणि इतर गोष्टींपासून दुर्मिळ भूवैज्ञानिक घटनांमुळे अशा प्रकारची रचना तयार झाल्याचा संशोधकांचा दावा आहे. मात्र, हे अवशेष नैसर्गिकरित्य तायर झाले नसून मानव निर्मीत असल्याचा स्थानिकांचा दावा आहे.