Crab Dish Bill: एक महिला महिलेने रेस्तराँमध्ये गेल्यावर चिली क्रॅब खेकड्याची डिश मागवली. मित्रांसोबत छान जेवणही झाले. मात्र, हातात बिल पडल्यावर त्यावरील रक्कम पाहून सगळ्यांचेच डोळे पांढरे झाले. या रेस्तराँने महिलेला तब्बल 680 डॉलरचे म्हणजेच 56 हजार 503 रुपयांचे बिल दिले. त्यावरील रक्कम पाहून तिच्या पायाखालची जमिनच सरकली आहे. ही महिला जपानची असून ती अलीकडेच तिच्या मित्रांसोबत सिंगापूर येथे फिरण्यासाठी आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुंको शिनबा असं या महिलेचे नाव असून तिने 19 ऑगस्ट रोजी सीफूज पॅराडाइज रेस्तराँमध्ये जेवण्यासाठी गेली होती. वेटरने तिथली स्पेशलिटी असलेल्या प्रसिद्ध अलास्का किंग चिली क्रॅब डिश ऑर्डर करण्याचा सल्ला दिला. वेटरने या डिशबद्दल सांगताना खेकड्याच्या या डिशची किंमत 20 डॉलर असेल, असं सांगण्यात आलं. त्यानुसार त्यांनी ही डिश ऑर्डर केली. मात्र, वेटरने सांगण्यात चुक केली असल्याचा आरोप तिने केला आहे. 


20 डॉलर हे शुल्क प्रति 100 ग्रॅमसाठी होते. तसंच, खेकडा शिजवण्याआधी कुकने त्याच्या वजनाबाबतही कोणती माहिती दिली नाही. चार जण जितके खाऊ शकतात त्याप्रमाणे जवळपास 3,500 ग्रॅमची डिश देण्यात आली. त्यानुसार या डिशची किंमत 680 ग्रॅम इतकी आहे. 


चार जणांच्या जेवणाची किंमत इतकी कशी होऊ शकते, हे पाहून आम्हीही आश्चर्यचकित झालो आहेत. आमच्यापैकी कोणालाही काहिच सांगण्यात आलं नाही की संपूर्ण खेकडा फक्त आमच्यासाठी शिजवला जाईल. कारण काही रेस्तराँमध्ये खेकड्याचा काहीच भाग शिजवला जातो, असं 50 वर्षीय व्यक्तीने सांगितलं आहे. 


रेस्तराँचे बिल पाहून शिनबाने सीफूड पॅराडाइज रेस्तराँला पोलिसांना बोलवण्यास सांगितले. त्यानुसार पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तेव्हा कर्मचाऱ्यांनी आम्ही अतिरिक्त बिल दिले नसून त्या डिशचे जितके पैसे होतात त्यानुसारच बिल लावले. तसंच अशा प्रकारची डिश मागवलेल्या अन्य ग्राहकांच्या बिलाची पावतीदेखील रेस्तराँकडून दाखवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर रेस्तराँने महिलेला $78 डॉलर (6,479) रुपयांची सूट देण्यास सहमत झाले. 


पॅराडाईज ग्रुपच्या प्रतिनिधीने सांगितले की, ते त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. ग्राहकांना ऑर्डर देण्यापूर्वी अलास्कन किंग क्रॅबची किंमत आणि वजन याबद्दल स्पष्टपणे माहिती देतात. रेस्टॉरंटच्या प्रतिनिधीने एका निवेदनात म्हटले आहे की, "कोणताही गैरसमज टाळण्यासाठी, कर्मचार्‍यांनी संपूर्ण अलास्कन किंग क्रॅब तयार करण्याआधी टेबलवर आणून दाखवले होते. मात्र त्यानंतरही बिल आल्यावर, ग्राहकांने बिल भरण्यास नकार दिला आणि पोलिस तक्रार केली. त्यामुळे, रेस्टॉरंट मॅनेजरने पोलिस तक्रार करण्यास मदत केली.