दक्षिण लेबनानमध्ये सीमेवजवळ युद्धाचं कव्हरेज करणाऱ्या एका पत्रकाराचा इस्त्रालय सैन्याने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. तसंच सहा रिपोर्टर जखमी झाले आहेत. ठार झालेला पत्रकार न्यूज एजन्सी रॉयटर्सचा व्हिडीओग्राफर होता. मिळालेल्या माहितीनुसार, हे पत्रकार दक्षिण लेबनानमध्ये युद्धाचं कव्हरेज करत असताना इस्त्रालयच्या सैन्याने रॉकेट डागले. मृत पत्रकाराचं नाव Issam Abdallah आहे. जखमी पत्रकारांना रुग्णालयात दाखल केलं आहे. घटनास्थळाचे फोटो समोर आले असून, यामध्ये जळलेली कार दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल जजीरा आणि एजन्स फ्रान्स-प्रेसमधील (Agence France-Presse) पत्रकारांचा एक गट इस्रायल सीमेजवळ असणाऱ्या अल्मा अल-शाबजवळ (Alma al-Shaab) काम करत होते. येथे इस्रायली सैन्य आणि लेबनानमधील सैन्य एकमेकांवर गोळीबार करत आहेत. 


रॉयटर्सने यासंबंधी निवेदन प्रसिद्ध करत माहिती दिली आहे की, आम्हाला तुम्हाला सांगताना फार दु:ख होत आहे की आमचे व्हिडीओग्राफर Issam Abdallah यांचा मृत्यू झाला आहे. ते दक्षिण लेबनानमधील रॉयटर्सच्या टीमचा भाग होते, जे लाईव्ह सिग्नल देण्याचं काम करत होते. 


रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, सीमा भागात इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात त्यांचे दोन पत्रकार थेअर अल सूडानी आणि मेहर नजाहदेखील जखमी झाले आहेत. आम्ही यासंबंधी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसंच मृतांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांची मदत करत आहोत. युद्धाचा फटका बसलेल्या लोकांसह आमच्या संवेदना कायम आहेत.


इस्त्रायल आणि हमासमधील युद्धाचा शुक्रवारी सातवा दिवस होता. 7 ऑक्टोबरला पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासने गाझा पट्टीवरुन इस्त्रायलवर तब्बल 5 हजार रॉकेट्स डागले होते. हमासने या हल्ल्याची जबाबदारी घेताना ही इस्त्रायलविरोधातील लष्कर कारवाई असल्याचं सांगितलं होतं. हमासने फक्त 25 मिनिटांमध्ये 5000 रॉकेट्स डागले होते. यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलमध्ये घुसखोरी करत लष्कराच्या वाहनांचा ताबा घेतला  होता. अनेक लोकांनाही त्यांनी ठार केल. या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांनी प्राण गमावले आहेत.