`श्रीमंत व्हायचं असेल तर चांदी खरेदी करा`; प्रसिद्ध लेखकाचा सल्ला, म्हणाला `4 वर्षांनी सोन्यापेक्षा जास्त...`
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी (Robert T. Kiyosaki) यांचं एक ट्वीट (Tweet) सध्या व्हायरल झालं आहे. यामध्ये त्यांनी लोकांना भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
आपण श्रीमंत व्हावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातात अमाप पैसा यावा आणि त्यासाठी मेहनत करुन श्रीमंत व्हावं यासाठी अनेक तरुण-तरुणी दिवसरात्र मेहनत करत असतात. दरम्यान, श्रीमंत होताना आपण गुंतवणूक कुठे आणि कशाप्रकारे करतो हादेखील महत्त्वाचा मुद्दा असतो. जर तुमचंही श्रीमंत व्हायचं स्वप्न असेल तर मग सोन्यानंतर सर्वात महाग असणारा धातू चांदीमध्ये गुंतवणूक करा. हे आम्ही नाही तर Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी (Robert T. Kiyosaki) सांगत आहेत.
"डॉलर फेक, चांदी खरेदी करा"
रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी एक ट्विट केलं असून, डॉलरला फेक आणि चांदीला सुरक्षित म्हटलं आहे. त्यांनी चांदीमध्ये गुंतवणूक करणं सध्याच्या घडीची सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचं म्हटलं आहे. रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "सर्वात मोठा गुंतवणुकीचा सौदा: ग्रीनीज सोलार ईव्हीच्या मागणीत चांदी अजूनही 50% कमी आहे. तेलानंतर चांदी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वापरली जाणारी वस्तू आहे. शतकानुशतके चांदी ही पैशांप्रमाणे आहे. कोणाला 1 चांदीचे नाणं खरेदी करणं परवडणारं नाही?, तरीही बहुतेक लोक बनावट बनावट डॉलर्स वाचवण्यास प्राधान्य देतात. हे उदासीन आहे".
सोन्याच्या गुंतवणुकीवर आधीही दिला होता सल्ला
प्रसिद्ध लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी लोकांना श्रीमंत होण्याचा फॉर्म्यूला सांगताना चांदीत गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी असे ट्वीट केले आहेत. काही दिवसांपूर्वी रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी काही दिवसांपूर्वी चांदीत गुंतवणूक करण्याचा सल्ला देत एक ट्वीट करत सांगितलं होतं की "जर तुम्ही श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहत असाल तर वेळ आली आहे. गरिबांनी आता श्रीमंत होण्याची वेळ आली आहे. चांदीत गुंतवणूक करा". थोडक्यात चांदीत गुंतवणूक करत तुम्ही श्रीमंत होऊ शकता असं त्यांना सांगायचं होतं.
500 डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज केला होता व्यक्त
रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी आपल्या ट्वीटमध्ये चांदीसाठी एक आऊटलूकही शेअर केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की "गरीब आता श्रीमंत होण्याची वेळ. स्टॉक, बाँड, म्युच्यूअल फंड, ईटीएफ आणि रिअल इस्टेट सगलं काही कोसळलं आहे. अशा वेळेत चांदीकडे वळा. चांदी पुढील 3 ते 5 वर्षं 20 डॉलर्स असेल. पण आगामी काळात ती 100 ते 500 डॉलरपर्यंत जाईल". रॉबर्ट टी. कियोसाकी यांच्या मते कोणीही चांदी खरेदी करु शकतात. गरीबही चांदी खरेदी करु शकत असल्याने त्यांनी गुंतवणूक केली पाहिजे.
दरम्यान रॉबर्ट टी. कियोसाकी याचं ट्वीट व्हायरल झालं आहे. अमेरिकेत काही दिवसांपूर्वी बँकिंग संकट निर्माण झालं होतं. कियोसाकी यांनी त्यावेळी लोकांना या संकटावर मात करण्यासाठी आणि स्वतःला समृद्ध ठेवण्यासाठी G, S, BC विकत घेण्याचा सल्ला दिला होताय आता तुम्ही विचार करत असाल की हे काय आहे? रिच डॅड पुअर डॅडच्या लेखकाने ट्विटरवरुन सांगितलं होतं की, "आपण अजून बुडणार आहोत. बँका बुडण्याच्या जमान्यात G म्हणजे सोने, S म्हणजे चांदी आणि BC म्हणजे बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी. या तिघांमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, असा त्यांचा विश्वास आहे.