सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान BAPS श्री स्वामीनारायण मंदिराला भेट देताना ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भाविकांना संबोधित केले. यादरम्यान त्यांनी सार्वजनिक सेवेच्या दृष्टीकोनातील मार्गदर्शक तत्त्व म्हणून धर्म या संकल्पनेबद्दल सांगितले.  ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शनिवारी पत्नी अक्षता मूर्तीसह लंडनमधील एका मंदिराला भेट देताना हिंदू धर्माबद्दल खुलासा केला. यावेळी त्यांनी धर्माला 'प्रेरणा आणि सांत्वन' करणारे स्त्रोत असल्याचे सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूके निवडणुकीच्या काही दिवस आधी BAPS श्री स्वामीनारायण मंदिरात मुक्काम केलेल्या सुनक यांनी भाविकांना संबोधित केले आणि सार्वजनिक सेवेचे आवाहन केले. त्यांनी धर्म या संकल्पनेचे वर्णन सार्वजनिक सेवेच्या दृष्टीकोनात मार्गदर्शक तत्त्व म्हणून केले.


मला भगवत गीतेवर...


सुनक म्हणाले, "मी आता हिंदू आहे आणि तुमच्या सर्वांप्रमाणे मलाही माझ्या विश्वासातून प्रेरणा आणि सांत्वन मिळते. मी भगवद्गीतेवर खासदार म्हणून शपथ घेतली आणि मला त्याचा गर्व आहे. स्वत:ला गर्वाने हिंदू' म्हणवून घेणारा सुनक पुढे म्हणाले की, "आमचा धर्म आम्हाला कर्तव्य पूर्ण करण्यास सांगते आणि परिणामांची चिंता करू नये, असेही सांगते. आम्ही ते प्रामाणिकपणे केले तर. माझ्या प्रेमळ पालकांनी मला हेच शिकवले आणि मी माझे जीवन अशा प्रकारे जगण्याचा प्रयत्न करतो. आणि हेच माझ्या दोन्ही मुलींना पण द्यायचं आहे. त्या मोठ्या होतील तेव्हा त्यांना मला या गोष्टी द्यायच्या आहेत. हाच धर्म आहे जे सार्वजनिक ठिकाणी काम करताना मला मार्गदर्शन करत राहते. 


युकेचे पंतप्रधान यांनी यावेळी सगळ्यांसोबत खास वेळ घालवला. कामगार पक्षाचे नेते स्टारर यांनी मंदिरात जल अर्पण करून पूजा केली. सुनकच्या एक दिवस आधी विरोधी पक्षनेते आणि मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टारर हेही लंडनमधील एका मंदिरात पोहोचले. यावेळी त्यांनी अनेक मुलांशी संवाद साधला आणि पूजेतही सहभाग घेतला. त्यांनीही परमेश्वराच्या मूर्तीवर जल अर्पण केले. स्टारमरने आपल्या भाषणात किंग्सबरी मंदिराचे वर्णन करुणेचे प्रतीक म्हणून केले. स्टारमर म्हणाले होते की, जर त्यांनी निवडणूक जिंकली तर त्यांचे सरकार ब्रिटिश भारतीय समुदायासाठी काम करेल. ब्रिटनमध्ये हिंदूफोबियाला स्थान नाही. देशाचे तुकडे करणे किंवा तोडण्याचे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही.


सुनक यांनी मुदतपूर्व निवडणुकीची घोषणा 


ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पीएम सुनक यांनी 22 मे रोजी त्यांच्या 10 डाउनिंग स्ट्रीट येथील निवासस्थानावरून याची घोषणा केली होती. पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक पहिल्यांदाच निवडणुकीत मतदारांसमोर जाणार आहेत. सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाने 2022 च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांचा चेहरा जाहीर केला नाही.


44 वर्षीय ऋषी सुनक हे ब्रिटनमधील भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान आहेत. ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला. जानेवारी 2025 मध्ये येथे सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता होती. निवडणूक जाहीर करण्यासाठी सुनक यांच्याकडे डिसेंबरपर्यंतचा वेळ होता, मात्र त्यांनी ७ महिने अगोदर घोषणा केली. 


निवडणुकीत सुनक यांचा सामना मजूर पक्षाचे नेते केयर स्टारमर यांच्याशी आहे. स्टारमर हे इंग्लंडमधील सार्वजनिक अभियोगांचे माजी संचालक आणि एप्रिल 2020 पासून मजूर पक्षाचे नेते आहेत. अनेक ओपिनियन पोलमध्ये लेबर पार्टी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षापेक्षा खूप पुढे आहे.


सर्वेक्षणात ऋषी सुनक पराभूत 


द इकॉनॉमिस्टने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात सुनक यांच्या पक्षाला 117 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याचवेळी, सावंता-गार्डियनच्या सर्वेक्षणात असा दावा करण्यात आला होता की, कंझर्व्हेटिव्ह पक्ष केवळ 53 जागांपर्यंत मर्यादित राहू शकतो, जे 2019 च्या निवडणुकीत 365 जागांच्या तुलनेत खूपच कमी आहे.


त्याच वेळी, केयर स्टार्मरच्या मजूर पक्षाला 650 जागांच्या सभागृहात 516 जागा मिळण्याचा अंदाज होता. 7 सर्वेक्षणांच्या सरासरीनुसार सुनक यांना 95 जागा आणि स्टारमरला 453 जागा मिळाल्या आहेत.