Rishi Sunak : ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान, भारतीयांचा जगभर डंका!
मॉर्डंट पंतप्रधानांच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानं Rishi Sunak हे पुढील पंतप्रधान असणार आहेत.
Britain New Prime Minister : ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी 20 ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान कोण असेल, यावर जगभरात चर्चा होताना दिसत होती. त्यानंतर आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान असणार आहेत.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत बोरिस जॉन्सन, ऋषी सुनक आणि पेनी मॉर्डेंट यांच्या नावांचा विचार केला जात होता. ब्रिटिश संसदेत एकूण 357 टोरी खासदार (कंझर्वेटिव्ह पक्षाचे खासदार) आहेत. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी 100 खासदारांच्या समर्थनाची आवश्यकता असते. त्यानंतर आता ऋषी सुनक यांचं नाव जाहीर करण्यात आलंय.
मॉर्डंट पंतप्रधानांच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानं सुनक हे पुढील पंतप्रधान असणार आहेत. आधी यूकेच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतली, त्यानंतर कॅबिनेट मंत्री पेनी मोरडाऊंट यांनीही माघार घेतली. त्यामुळे ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी बिनविरोध निवड झाली.
कोण आहेत Rishi Sunak -
ऋषी सुनक यांचे आईवडील भारतीय वंशाचे होते. मात्र, त्याचं कुटुंब पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्डमधून राजकारण आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मुर्ती यांचे ते जावई आहेत.
आणखी वाचा - ब्रिटन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या Rishi Sunak यांनी जपली भारतीय संस्कृती
ऋषी सुनक यांची ब्रिटनमध्ये खुप चांगली प्रतिमा आहे. कोरोना काळात केलेल्या कामामुळे अनेकांनी त्यांनी त्यांचं कौतूक केलं होतं. 2015 साली ऋषी सुनक पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर आता ब्रिटनच्या पंतप्रधान पदावर विराजमान होणारी भारतीय वंशाची पहिला व्यक्ती असणार आहे.