Corona । कोरोनाचे रुग्ण वाढल्याने टेन्शन, हे शहर केले लॉक
चीनमध्ये (China) कोरोना विषाणूची (Coronavirus) भीती वाढत आहे. कोरोना संसर्गाचा नवा धोका वाढला आहे. आता ग्वांगझोऊ (Guangzhou) या शहरात लॉक करण्यात आले आहे.
बीजिंग : चीनमध्ये (China) कोरोना विषाणूची (Coronavirus) भीती वाढत आहे. कोरोना संसर्गाचा नवा धोका वाढला आहे. आता ग्वांगझोऊ (Guangzhou) या शहरात लॉक करण्यात आले आहे. त्यामुळे हे शहरातील व्यवहार देखील बंद झाले आहेत. प्रशासनाने स्पष्ट केली की, शहर सध्या पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी, शांघायमधील वाढते रुग्ण देखील सरकारसाठी चिंतेचे कारण आहेत. येथे कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
शांघायमध्ये कडक लॉकडाऊन
शांघाय शहरात आतापर्यंत संसर्गाची सर्वाधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत. सोमवारी, येथे 26,087 रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यापैकी फक्त 914 प्रकरणांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून आली. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी 26 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शांघायमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक कुटुंबांना तीन आठवड्यांपूर्वी घरे सोडण्याची परवानगी नाही.
ग्वांगझोऊमध्ये 27 रुग्ण आढळलेत
ग्वांगझोऊसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला नाही, परंतु संसर्ग थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे भविष्यात येथेही कठोर पावले उचलली जाऊ शकतात. हे बंदर शहर हाँगकाँगच्या वायव्येस क्षेत्रात आहे आणि येथे अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. सोमवारी, ग्वांगझोऊमध्ये 27 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात, स्थानिक स्तरावर 23 बाधित रुग्ण आढळल्यानंतर, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्यात आल्यात. ऑनलाइन शिक्षणाची घोषणा करण्यात आली. येथे एका प्रदर्शन केंद्राचे रुपांतर तात्पुरत्या रुग्णालयात केले जात आहे. शहराचे प्रवक्ते चेन बिन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, जेव्हा नागरिक अगदी आवश्यक असेल तेव्हाच ग्वांगझोऊ सोडू शकतात. यासाठी, जाण्यापूर्वी 48 तास आधी कोरोना चाचणी करणे करजेचे आहे. ही चाचणी निगेटीव्ह असली पाहिजे.