रियाध : मानवी चेहरा असणारा एका रोबोटला एका देशानं चक्क नागरिकता प्रदान केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रोबोटचं नाव 'सोफिया' असं आहे. सोफियाला नागरिकता प्रदान करून अशा पद्धतीनं रोबोटला नागरिकता देणारा जगातील पहिला देश अशी ओळख 'सौदी अरेब'नं निर्माण केलीय. 


सौदी अरबची राजधानी रियाधमध्ये 'फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह'च्या स्टेजवर सोफियाला नागरिकता प्रदान करण्यात आली. सोफिया हा रोबोट हॉलिवूड अभिनेत्री आड्री हेपबर्नसारखा दिसतो.


'हा विशेष सन्मानामुळे मला खूप गौरवान्वित झाल्यासारखं वाटतंय. एखाद्या रोबोटला नागरिकतेची ओळख मिळणं ऐतिहासिक आहे' असं यावेळी सोफिया या रोबोटनं म्हटलं.


डेविड हैनसन यांनी सोफिया हा रोबोट तयार केलाय... हाँगकाँगच्या 'हॅनसन रोबोटिक्स'चे डेविड हे संस्थापक आहेत. ही कंपनी मानवाप्रमाणे दिसणारे रोबोट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. 


उल्लेखनीय म्हणजे, प्रेजेन्टेशन दरम्यान सोफियानं आर्टिफिशिअल इंटेलिजन्स रोबोटसचा मानवी अस्तित्वासाठी धोका असल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.