इंडोनेशिया त्सुनामी: लाईव्ह परफॉर्मेंस देताना असा वाहून गेला रॉक बँड ग्रृप
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
जकार्ता : इंडोनेशियामध्ये आलेल्या त्सुनामीमध्ये आतापर्यंत जवळपास 222 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोकं जखमी झाले आहेत. यातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंडोनेशियाचा फेमस पॉप बँड 'सेवंटीन'ला मागून आलेली लाट वाहून घेऊन गेली. या व्हिडिओमध्ये लोकांचा ओरडण्याचा आवाज येत आहे.
इंडोनेशियाच्या या पॉप बँडने माहिती दिली आहे की, या घटनेत त्यांचे हेड आणि रोड मॅनेजर यांचा मृत्यू झाला आहे. बँडचे ४ सदस्य अजून बेपत्ता आहेत. यामध्ये बँडचा गायक रिफियन याच्या पत्नीचा देखील समावेश आहे. या गायकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने आपल्या पत्नीसाठी लोकांना प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे.
पीएलएनचे २०० कर्मचारी आणि त्यांचा परिवार तन्जुंग लेसंग बीचवर पार्टी करत होते. या घटनेत वाचलेल्या बँडमधील एका सदस्याने म्हटलं की, तो या दरम्यान पाण्यात फक्त प्रार्थना करत होता.