Rolls Royce : सध्या अनेक देशांच्या स्पेस एजन्सी मून मिशन राबवत आहेत. चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे संशोधकांचे उद्दीष्टय आहे. या अनुषांगाने संशोधक सातत्याने प्रयत्न करत आहेत. अनेक देशांनी चंद्रावर आपला बेस कॅम्प उभारण्याची तयारी सुरु केली आहे. चंद्रावर बेस कॅम्प तयार केल्यास वीज ही सर्वात प्राथमिक गरज असमार आहे. Rolls Royce ही प्रसिद्ध कार निर्माता कंपनी  चंद्रावर वीज पुरवठा करणार आहे. यासाठी Rolls Royce मिनी न्यूक्लियर पावर प्लांट निर्माण करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Rolls Royce ही कंपनी  सर्वात लक्झरी कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या कार सर्वात महागड्या कार म्हणून ओळखल्या जातात. जगभरात ठराविक लोकांकडेच  Rolls Royce कंपनीच्या कार आहेत. आता Rolls Royce कंपनी वेगळाच प्रयोग करणार आहे. ही कंपनी थेट चंद्रावर आपली कमाल दाखवणार आहे. चंद्रावर बेस कॅम्प तयार करणाऱ्या कंपन्यांना वीज उपलब्ध करुन देण्याचे काम ही कंपनी करणार आहे. 


120 इंच लांबीची ही मिनी अणुभट्टी


आयर्लंडमधील बेलफास्ट येथे नुकतीच एक अंतराळ परिषद पार पडली. या परिषदमध्ये Rolls Royce कंपनीने आपल्या अनोख्या प्रोजेक्टची घोषणा केली. रोल्स रॉयस कंपनीने या परिषदेत  मिनी न्यूक्लियर प्लांटचे मॉडेल सादर केले. 40 इंच रुंद आणि 120 इंच लांबीची ही मिनी अणुभट्टी आहे. या प्लांटच्या माध्यमातून चंद्रावर उभारल्या जाणाऱ्या बेस कॅम्पला अर्थता मानवी वस्तीला वीजपुरवठा केला जाणार आहे. यूके स्पेस एजन्सीचे मुख्य कार्यकारी पॉल बेट यांनी या प्रकल्पाबाबत अधित माहिती दिली.  इंग्लंडच्या स्पेस एजन्सीने या मिनी न्यूक्लियर पावर प्लांटसाठी रोल्स रॉयस कंपनीला सुमारे 30.62 कोटी रुपयांचा निधी दिला होता. रोल्स रॉयसचे अभियंते आणि शास्त्रज्ञ सध्या आण्विक विखंडन अणुभट्टीतून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेपासून ऊर्जा कशी निर्माण करायची यावर संशोधन करत आहेत.


येत्या सहा वर्षांत या अणुभट्टीतून वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वीपणे कार्यन्विक होवू शकतो अशी संशोधकांना अपेक्षा आहे. 2030 पर्यंत ते ही मिनी अणुभट्टी कार्यन्वित होईल असा Rolls Royce कंपनीने दावा केला आहे. चंद्राच्या फक्त एकाच भागात सूर्य प्रकाश आहे. येथे सूर्य प्रकाशाचा उजेड असतो. तसेच ऊर्जा निर्मीतीसाठी सौर ऊर्जेचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, दुसरा भाग हा कायम अंधारात असतो. येथे वीजेचे सोय उपलब्ध करुन देणे  Rolls Royce च्या मिनी न्यूक्लियर पावर प्लांटचा उद्देष आहे.