Viral News : फ्लाईंग रोमान्स! प्रवाशांसमोर 4 तास कपलचे अश्लिल चाळे, Photos सोशल मीडियावर व्हायरल
Romantic Couple Viral : X वर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये कपलचे अश्लिल चाळे पाहिला मिळत आहे. युजर्सने म्हटलंय की, `4 तासांच्या फ्लाइटमध्ये मला काय पाहावे लागलं`
Couple Viral Photo : गेल्या काही वर्षांमध्ये जगाचे चित्र पालटलंय. तरुण पिढीमध्ये लाज, नम्रता आणि आदर दिसून येत नाही आहे. खुल्लम खुल्ला प्रेम करताना ही तरुण पिढी आपल्या अनेक ठिकाणी दिसते. कधी कुठलं गार्डन असो किंवा बस स्टॉप असो...खरं तर शहरात अशी कुठलीही जागा या लोकांनी सोडली नाही जिथे या कपलचे रोमान्सचे अश्लिल चाळे पाहिला मिळत नाही. लोकल ट्रेनचा प्रवास असो किंवा बसचा प्रवास असो...आपण सोशल मीडियावर असे असंख्य व्हिडीओ पाहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर फ्लाईंग रोमान्सचे फोटो व्हायरल झाले आहेत. (Romantic Couple Flying Romance In front of passengers for 4 hours couple obscene Photos viral on social media)
हद्द केली राव यांनी!
व्हायरल होत असलेले हे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @babyibeenajoint नावाच्या हँडलने शेअर पोस्ट केले आहे. त्या यूजर्सने लिहिलं आहे की, 4 तासांच्या फ्लाइटमध्ये मला काय पाहावे लागलं. या पोस्टनंतर आतापर्यंत 2 कोटींहून अधिक लोकांनी ही पाहिली आणि त्यानंतर संताप व्यक्त केलाय. या कपल विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अशा लोकांना कारवाई व्हायला हवी अशी मागणीही सोशल मीडियावर जोर धरत आहे.
कुठली आहे ही घटना?
खरं तर ही, घटना युनायटेडएअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये फर्स्ट क्लासमधील आहे. या प्लाइटमध्ये एक जोडपं संपूर्ण फ्लाइट दरम्यान जवळपास 4 तास एकमेकांनासोबत रोमान्स करताना दिसून आलं. त्या दोघांना एवंढही भान नव्हतं की हे घर नाही आपण सार्वजनिक ठिकाणी प्रवास करतोय. विमानातील तीन सीटवर हे दोघे एकमेकांना मिठीत घेऊन झोपले होते. नुसते झोपले नव्हते तर अश्लिल चाळे सुरु होते. त्यांच्या या कृतीमुळे अस्वस्थ झालेल्या एका प्रवाशाने त्यांचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली.
काही वेळातच ही फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. एका यूजरने म्हटलंय की, एखाद्याच्या गोपनीयतेला सार्वजनिक करणे हा त्याहूनही मोठा गुन्हा आहे, असं म्हटलंय. ही पहिलीच घटना नसून फ्लाइटमधील अश्लीलतेपासून गैरवर्तनापर्यंत असे अनेक प्रकरणे समोर आलेत आहे.
गेल्या फेब्रुवारीमध्ये दार्जिलिंगमधील एका 26 वर्षीय महिलेने फ्लाइटमध्ये प्रवास करत असताना एका सहप्रवाशाने तिचा विनयभंग केल्याचा दावा त्याने केला होता.