Romina Pourmokhtari: राजकीय डावपेच जमत नाहीत किंवा रुचत नाहीत म्हणून आम्ही या क्षेत्रापासून लांबच बरे असं म्हणणाऱ्यांची संख्या सध्याच्या तरुणाईत प्रचंड आहे. पण, यालाच शह देत एका तरुणीनं राजकारणात प्रवेश केला आणि ती जगातील सर्वात तरुण मंत्री म्हणून निवडली गेली. संपूर्ण जगाने या तरुणीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. ज्यांनी तिच्याविषयी पहिल्यांदाच ऐकलं आणि वाचलं ते तिला पाहतच राहिले. कारण, उल्लेखनीय कामगिरीसोबतच तिचं सौंदर्यही लक्ष वेधणारं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वीडनमध्ये (Swden) हल्लीच नव्यानं सत्तेवर आलेल्या सरकारतर्फे, नवनिर्वाचित पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी एक मोठा निर्णय घेतला. संपूर्ण जगात त्यांच्या याच निर्णयाची चर्चा झालीय कारण, त्यांनी climate minister म्हणून रोमिना पौरमोख्तारी (Romina Pourmokhtari) या अवघ्या 26 वर्षीय तरुणीची निवड केली. 


अधिक वाचा : भारत विरुद्ध वक्तव्य करणं ब्रिटिश गृहमंत्र्यांना पडलं भारी, द्यावा लागला राजीनामा


रोमिना (Romina Pourmokhtari ) क्लायमेट अॅक्टिविस्ट ग्रेटा थुनबर्ग (Greta Thunberg) यांच्याच परिसरातील मूळ रहिवासी. आपल्याला मिळालेल्या मंत्रीपदाचा त्यांना सार्थ अभिमान आहे. 26 वर्षीय रोमिना आतापर्यंत लिबरल पार्टीच्या युवा शाखा प्रमुख होत्या. राजकारतही त्या बऱ्यापैकी सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्या पंतप्रधानपदी असणाऱ्या क्रिस्टरसन यांची त्यांनी एकेकाळी निंदाही केलीये. 




स्टॉकहोमच्या उपनगरीय भागात ईराणी कुटुंबात रोमिना यांचा जन्म झाला. त्यांना जलवायू आणि पर्यावरण विभाग वारसा म्हणून मिळाला आहे. असं म्हणायला हरकत नाही. कारण, स्वीडनच्या प्रख्यात अॅक्टिविस्ट, थुनबर्ग यासुद्धा याच भागातून आहेत. सध्या रोमिना यांच्या वाट्याला इतक्या कमी वयात आलेलं मंत्रीपद चर्चेत आहे. पण, त्यासोबतच त्यांचं लाघवी सौंदर्य अनेकांच्याच नजरा खिळवत आहे.