Florida model black widow poison spider: हौसेला मोल नाही... अशी म्हण आहे. मात्र, बऱ्याच लोकांना अशा विचित्र गोष्टींची हौस असते ही कुणी कल्पनाही करु शकत नाही. अनेकजण कुत्र, मांजर यांसारखे प्राणी तसेच विविध प्रकारचे पक्षी आणि अगदी वाघ, सिंह देखील पाळतात. मात्र, फ्लोरीडाच्या एका मॉडेलने स्पायडर अर्थात कोळी किडा पाळला आहे. हा स्पायडर साधा सुधा नाही तर अत्यंत विषारी आहे. हा स्पायडर  सापापेक्षा 15 पट विषारी आहे. 
रोझी नावाच्या मॉडेलने हा कोळी पाळला आहे. रोजी अमेरिकाच्या फ्लोरिडा येथे राहणारी आहे. घरात पाळलेल्या या स्पायडरचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 याचे नाव स्पायडर ब्लॅक विडो (Black Widow) असे आहे.  जगात  स्पायडरच्या विविध प्रकारच्या प्रजाती आहेत. मात्र, ब्लॅक विडो स्पायडर अत्यंत विषारी आहे.  हा स्पायडर सापापेक्षा 15 पट विषारी आहे. या स्पायडरने चावा घेतल्यास व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे. 


मॉडेलला हा ब्लॅक विडो स्पायडर कुठे सापडला?


रोझी एक मॉडेल असून  ती एक  ग्लैम साइंटिस्ट (Glam scientist) देखील आहे. रोझी शार्क, मगरी यांसारख्या प्राण्यांवर देखील संशोधन करते. फ्लोरिडा येथील जंगलात फिरत असताना रोझीच्या कपड्यांवर हा ब्लॅक विडो स्पायडर चढला. यानंतर ती त्याला घरी घेवून आली. ब्लॅक विडो स्पायडरला घाबरण्याची गरज नाही. कारण, त्याला मनुष्यापासून धोका जाणवल्यास तो काहीच करत नाही. या विनाकरण त्रास देण्याचा अथवा त्याच्यावर हल्ला केला तरच तो चावा घेण्याची भिती असते असे रोझी सांगते. रोझीने या ब्लॅक विडो स्पायडर सोबतच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून वेगवेळ्या प्रकारच्या कमेंट्स आल्या आहेत. अनेक जण तिला या स्पायडरला पुन्हा जंगलात सोडून देत आहेत. तर, अनेक जण अशा प्रकारचा स्पायडर पाळणे अत्यंत धोकादायक असल्याचे सांगत आहेत. 


ब्लॅक विडो स्पायडर का आहे इतका विषारी?


ब्लॅक विडो स्पायडरने चावा घेतल्यानंतर स्नायूंमध्ये वेदना आणि क्रॅम्प्स येतात. अस्वस्थ वाटून व्यक्तीच्या डोळ्यांसमोर हळूहळू अंधार येतो आणि श्वास घेण्यास खूप त्रास होतो. यातच व्यक्तीचा मृत्यू देखील ओढावू शकतो.