मुंबई: भारतील राज्यसभा आणि लोकसभेत जम्मू- काश्मीर येथे लागू करण्यात आलेल्या अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा अनुच्छेद रद्दही झाला, ज्याचं साऱ्या देशातून आणि जगातूनही स्वागत झालं. पण, याचे थेट पडसाद हे शेजारी राष्ट्र अर्थातच पाकिस्तानमध्ये पाहायला मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या मंत्रीमंडळातील हालचालींची चर्चा जागतिक राजकीय पटलावर विशेष गाजली. ज्याची परिसीमा बुधवारी गाठली गेली. जेव्हा एका पाकिस्तानी खासदारांनी केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांना कुत्र्याची उपमा देत संबोधलं. 


जम्मू- काश्मीरला विशेषाधिकार देणारं अनुच्छेद ३७० रद्द करण्याप्रकरणी आणि जम्मू- काश्मीरची विभागणी दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानच्या संसदेत याविषयीची चर्चा सुरु असताना हा प्रकार पाहायला मिळाल्याचं वृत्त 'एएनआय'ने प्रसिद्ध केलं. पाकिस्तानमधील सत्तारुढ पक्षाची  काश्मीर मुद्द्यावरील भूमिका पाहत त्याविरोधात वक्तव्य करतानाच हा प्रकार घडला. 


मुशहीदुल्ला खान हे खासदार संसदेत बोलत असतानाच चौधरी यांनी त्यांना रोखत काही वक्तव्य केलं. त्या बदल्यात खासदारांनी मंत्रीमहोदयांचाचा उल्लेख 'डब्बू', असा केला. खान आणि चौधरी यांच्यातील शाब्दीक बाचाबाची इतकी वाढली की, अध्यक्ष सादिक संदरानी यांना वारंवार मध्यस्ती करावी लागत असल्याचं पाहायला मिळालं. अखेर त्यांनी फवाद चौधरी यांना शांतता राखत त्यांचं स्थान ग्रहण करण्यास सांगितलं. 


'तुम्ही  निर्लज्ज माणसं. मी तुम्हीला तर घरी गळ्याला बांधून ठेवलं होतं आणि तुम्ही इथे आलात....', अशी कुत्र्याची उपमा देच या शाब्दिक बाचाबाचीदरम्यान खान हे चौधरींना उद्देशून बोलले. खान यांचे हे उदगार ऐकताच चौधरींनी त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. पण, तेथे उपस्थित असलेल्यांनी प्रसंग सावरण्याचा प्रयत्न केला. कोणीतरी यांना शांत करा रे... इतरांचा आदर कसा करावा हे शिकण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे, असं म्हणत खान यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. तुमच्यासारखे खूप पाहिले मी.... असं म्हणत खान यांनी स्पष्ट शब्दांमध्ये फवाद चौधरी यांच्यावर आगपाखड केली.