नवी दिल्ली : पाकिस्तान (Pakistan) मध्ये मंगळवारी अचानक लोकांमध्ये भीती पसरली जेव्हा आकाशात त्यांना काही लढाऊ विमानं उडताना दिसली. सोशल मीडियावर अनेक यूजर्सने दावा केला आहे की, कराचीवर भारतीय एयरफोर्सचे फायटर जेट उडत आहेत. भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत असल्याची भीती कराचीमध्ये पसरली. पाकिस्तानातील लोकांनी यामुळे रात्र भीतीच्या सावटाखाली काढली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवर कराची ब्लॅकआउट (#KarachiBlackOut) ट्रेंड व्हायला लागला. पाकिस्तानमधील NBC चे माजी रिपोर्टर वाज खानने ट्विट केलं की, 'प्रिय भारतीय उच्चायोग (@IndiainPakistan) अफवा पसरत आहे की, भारतीय वायुसेना पीओके आणि सिंध-राजस्थान सेक्टरमध्ये घुसखोरी करत आहे. कृपया स्थिती स्पष्ट करा.'



पाकिस्तानमधील अनेक लोकांनी यानंतर ट्विट केलं. एकाने म्हटलं की, मी कराची एअरपोर्ट जवळ राहतो. मी लढाऊ विमानं उडताना पाहिली. काय चाललं आहे.?


कराचीच्या लोकांमध्ये भारतीय वायुसेनेचे जवान एअरस्ट्राईक करण्यासाठी आल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. पण ती लढाऊ विमानं पाकिस्तानच्या वायुसेनेचीच होती. ANI च्या माहितीनुसार पाकिस्तानी वायुसेनेचे जवान त्यामुळे युद्धअभ्यास करत होते.


पाकिस्तानी वायुसेनेला देखील ही अफवा खरी वाटली. रात्री वायुसेना भारताकडून कोणती स्ट्राईक होणार तर नाही ना म्हणून हल्ल्याची तयारी करत होते. पण भारतीय हवाईदलाकडून असं काहीच नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं.