मॉस्को : रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine) मध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान इतर देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेपासून ब्रिटनपर्यंत अनेक देशांनी रशियाविरोधात कठोर कारवाई केली आहे. आता त्या कारवाईवर रशियाने पलटवार केलाय. रशियाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, हिलरी क्लिंटन यांच्यासह अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांवर अनेक निर्बंध घातले आहेत. पण हे कोणत्या प्रकारचे निर्बंध येणार आहेत याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तणाव वाढणार


राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले आहे. या युद्धानंतर अमेरिकेपासून युरोपियन युनियनच्या (European union) देशांपर्यंत सर्वांनी रशियन अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का दिला आहे. विविध निर्बंध लादले गेले आहेत. हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहेत. रशियातून येणारी तेलाची आयात थांबवली गेली आहे. या कारवाईमुळे रशियन अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.



आता रशियानेही या निर्बंधांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केलीये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यावर थेट रशियाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईवर अमेरिकेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिका सतत इशारे देत आहे. पण रशिया (Russia) ना आधी झुकले होते ना आता झुकण्याच्या मनस्थितीत आहे. यावेळी तो बदला घेण्यावर अधिक आत्मविश्वास दाखवत आहे. युक्रेनबरोबरचे युद्ध 20 दिवसांवर गेले आहे. दोन्ही देश अनेकदा वाटाघाटीसाठी बसले पण कोणताही तोडगा निघालेला नाही.



यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (zelensky) म्हणाले की ते, नाटोमध्ये सामील होणार नाहीत, परंतु त्यांची वृत्ती मऊ झालेली नाही. त्याचे सैन्य आजही रशियाला खंबीरपणे तोंड देत आहे. झेलेन्स्की यांनी स्वत: म्हटले आहे की, मी शेवटपर्यंत हार मानणार नाही आणि रशियाला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. याच कारणामुळे 20 दिवसांनंतरही रशिया राजधानी कीववर ताबा मिळवू शकलेला नाही. लवकरच मोठी कारवाई केली जाईल, असे दावे केले जात आहेत.