रशिया, चीन आणि भारत दहशतवादाविरूद्ध एकत्र
रशिया, चीन आणि भारत या तिन्ही देशांनी आज एकमुखानं दहशतवादाचा निषेध केला.
मुंबई : रशिया, चीन आणि भारत या तिन्ही देशांनी आज एकमुखानं दहशतवादाचा निषेध केला.
विविध स्वरूपातील दहशतवाद थांबवण्यासाठी तसंच त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जे कुणी दहशतवादी कृत्य करतात, दहशतवादाचं समर्थन करतात किंवा पाठिंबा देतात त्यांना त्याबद्दल जबाबदार ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असंही तिन्ही देशांनी यावेळी सांगितलं.
रशिया, चीन आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सामूहिक निवेदन प्रसिद्ध करून दहशतवादाचा मुकाबला करण्याचं शिवधनुष्य उचललं.