मॉस्को: रशियाच्या लष्कराने आपल्या नव्या आंतरखंडीय बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची चाचणी शुक्रवारी घेतली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली. या क्षेपणास्त्राला 'सरमत' असे नाव दिले आहे. हे क्षेपणास्त्र रशियाच्या 'वोयेवोडा'ची जागा घेईल ज्याला 'सैतान' म्हणून ओळखले जाते. 



राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यानी या महिन्याच्या सुरवातील म्हटले होते की, 'सरमत'चे वजन २०० मेट्रीक टन आहे. तसेच, वोयेवोडाहूनही अधिक दूरपर्यंत हे त्रेपणास्त्र मारा करण्याची क्षमता ठेवते. पुढे बोलताना ते म्हणाले की, उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावरही हे क्षेपणास्त्र उडाण भरू शकते. तसेच, जगातल्या कोणत्याही ठिकाणी हे क्षेपणास्त्र मारा करू शकते.