Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनयांच्यामध्ये धुमसणारी युद्धाची ठिणगी अद्यापही कायम असून, आता या ठिणकीतूनच मोठ्या वणव्याचा दाह साऱ्या जगाला सोसावा लागत असल्याचं चिन्हं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी नुकतंच युक्रेवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केल्याच्या वृत्ताला दुजोरा देत संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युक्रेननं पाश्चिमात्य क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानंतर रशियानं या हल्ल्याचं उत्तर हाइपरसोनिक इंटरमीडिएट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करून दिलं आहे असं पुतिन यांनी स्पष्ट करत अप्रत्यक्षरित्या संपूर्ण जगालाही इशाराच दिला. त्यांच्या मते या हल्ल्यासह आता रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असणाऱ्या युद्धाला जागतिक वळण मिळत आहे. रशियाकडून झालेल्या या हल्ल्यामुळं युद्ध आणखी गंभीर वळणावर आल्याचं म्हणत जागतिक स्तरावर रशियाच्या या हल्ल्याचा निषेध केला गेलाच पाहिजे असा सूर आळवला. 


ही जगाचीच परीक्षा...- पुतिन 


गुरुवारी रशियानं युक्रेनच्या डीनिप्रो या शहरावर एका जबर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रानं हल्ला चढवला. ज्यामुळं 33 महिन्यांपासून सुरू असणाऱ्या या युद्धात रोषाची नव्यानं भर पडली. दरम्यानच, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्राला संबोधित करताना आपल्या या निर्णयाची माहिती देत म्हटलं, 'मॉस्कोनं एका नव्या मध्यम अंतराच्या हाइपरसोनिक बॅलिस्टिक  "रोशनिक" (हेज़ेल) क्षेपणास्त्रानं युक्रेनच्या लष्करी तळावर हल्ला केला आहे. आमचं बलशाली लष्कर शत्रूपक्षाच्या कटकारस्थानांचं उत्तर देत आहे. जर, त्यांनी पाश्चिमात्य देशांतील शस्त्रास्त्रांचा वापर केला तर, रशियाला थेट युद्धासाठी ललकारचं जात असेल असाच याचा अर्थ होईल. आमच्याकडून होणारे हल्ले आता थांबणार नाहीत, पण आम्ही तुमच्या (जनतेच्या) सुरक्षितता आणि हितासाठी वचनबद्ध आहोत.'


हेसुद्धा वाचा : 35 की ...? दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये बदल? पालक विद्यार्थी संभ्रमात, बोर्डानं केला खुलासा 


गुरुवारी रात्री 8 वाजल्यानंतर रशियामध्ये एकाच वेळी अनेक घडामोडींना वेग आला आणि त्याचदरम्यान पुतिन यांनी देशातील जनतेला संबोधलं. या इशाऱ्यानंतरही युक्रेननं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी झालेल्या सल्लामसलतीनुसार रशियावर अमेरिकी आणि ब्रिटीश क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यापूर्वी युक्रेननं या शस्त्रांचा कधीच वापर केला नव्हता. युक्रेनची ही कृती सातत्यानं सुरूच राहिली, तर मात्र पुतिन अण्वस्त्रयुद्धाही हाक देण्याची भीती संपूर्ण जगातून व्यक्त केली जात आहे. ज्यामुळं तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग उभं असल्याचं दाहक वास्तव चिंतेत भर टाकत आहे.