Russia Warns: जगाच्या वाढल्या चिंता, रशियाने दिली तिसऱ्या महायुद्धाची धमकी
रशियाने पुन्हा एकदा संपूर्ण जगाच्या चिंता वाढवल्या आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या महायुद्धाची भीती वर्तवली जात आहे.
नवी दिल्ली : युक्रेन आणि रशिया (Russia vs Ukraine) यांच्यात सुरू असलेले युद्ध अजूनही थांबलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून रशियाने युक्रेनवरील हल्ले वाढवले आहेत. तो अधिक आक्रमकपणे युक्रेनवर हल्ले करत पुढे चालला आहे. दुसरीकडे युक्रेन नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) मध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत आहे. यावर मात्र रशियाने आक्षेप घेतला आहे. रशियाने याला विरोध करत, तिसऱ्या महायुद्धाची (Thirld world war) धमकी दिली आहे.
रशियाने याआधी अनेकदा अणुबॉम्बबाबत धमकी दिली आहे. त्यामुळे तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण आता रशियाच्या या आक्रमक भूमिकेमुळे जगभरातील देश गंभीर झाले आहेत. पण ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा रशियाच्या या धमकीकडे गांभिर्याने पाहिले जात आहे. रशियन सुरक्षा परिषदेचे उपसचिव अलेक्झांडर वेनेडिक्टोव्ह यांनी इशारा देत म्हटले की, म्हणाले की, युक्रेनला माहित आहे की जर ते नाटोमध्ये सामील झाले तर रशिया या युद्धाचे रूपांतर तिसऱ्या महायुद्धात करेल.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अलेक्झांडर वेनेडिक्टोव्ह यांनी सांगितले की, नाटो सदस्यांनाही असे पाऊल उचलण्याचे दुष्परिणाम समजतात. रशियाकडून हा इशारा अशा वेळी आला आहे, जेव्हा रशिया युक्रेनच्या अनेक भागात सातत्याने हल्ले करत आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही रशियाच्या तिसऱ्या महायुद्धाच्या धमकीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला महायुद्ध नको आहे, असे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. मॅक्रॉन म्हणाले की, आम्ही युक्रेनचे सार्वभौमत्व वाचवण्यासाठी मदत करत आहोत, मात्र रशियावर कधीही हल्ला करणार नाही.
इमॅन्युएल मॅक्रॉन पुढे म्हणाले की, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी आता हे युद्ध थांबवले पाहिजे. युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे.
30 सप्टेंबर रोजी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटो सदस्य होण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे आवाहन केले. तर रशियाने युक्रेनच्या १८ टक्के भागावर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे, अशा स्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनला लवकरात लवकर नाटोचे सदस्य बनवले पाहिजे.