Russia Ukrain War : रशियानं चारही बाजूंनी युक्रेनला घेरलं आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याची धडपड सुरू आहे. आता तर रशियानं काळ्या समुद्रातूनही युक्रेनला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशिया-युक्रेन युद्ध पेटलेलं असतानाच अमेरिकेन खासदारच्या वक्तव्यामुळे रशियाचं पित्त खवळलंय. युद्ध थांबवायचं असेल तर पुतीन यांना संपवायला हवं असं वादग्रस्त वक्तव्य अमेरिकचे खासदार लिंडसे ग्राहम (lindsay graham) यांनी केलंय. 


काय म्हणाले लिंडसे ग्राहम ? 
रशियात एखादा ब्रुटस आहे का ? युद्ध संपवायचं असेल तर एकच मार्ग आहे, रशियन नागरिकांपैकी एखाद्यानं या माणसाला (पुतीन) संपवायला हवं. जो कुणी हे करेल तो त्याच्या देशाची आणि जगाची मोठी सेवा करेल. जे काही घडतंय ते रशियन लोकच थांबवू शकतील. जर रशियन जनतेला आपलं आयुष्य अंध:कारमय होऊ नये असं वाटत असेल त्यांना कडक पावलं उचलावीच लागतील. असं वक्तव्य खासदार लिंडसे ग्राहम यांनी केलंय. 


त्यांच्या वक्तव्यानं रशियात खळबळ उडालीय. रशियन दुतावासानं लिंडसे यांच्या वक्तव्याचा कडक शब्दात निषेध केलाय. यावर अमेरिकेनं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणीही रशियानं केलीय. लिंडसे यांच्या वक्तव्यामागे रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष स्टॅलिन यांच्या मृत्यूची थिअरी सांगितली जातेय. 


सध्या पुतीन हे साऱ्या जगाच्या नजरेत खलनायक ठरलेत. युरोपियन देशांनी रशियावर कडक निर्बंध लादून आधीच रशियाची कोंडी केलीय. त्यात पुतीन यांच्या हत्येचा कट रचला जात असेल तर युद्ध कोणत्या वळणावर जाईल याची कल्पना न केलेलीच बरी.