नवी दिल्ली : रशियाकडून सतत हल्ले सुरु असताना आता अनेक देश युक्रेनच्या बाजुने उभे राहत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine war) अजून थांबलेलं नाही. चर्चेतून अजूनही कोणता मार्ग निघालेला नाही. अनेक देशांकडून शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन होत आहे. त्यातच आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी मंगळवारी युरोपियन संसदेला संबोधित केले. यादरम्यान झेलेन्स्की म्हणाले की, रशियाने सामान्य लोकांवर क्षेपणास्त्रे डागली. याला कोणीही माफ करणार नाही. तसेच कोणी विसरणार नाही. यावेळी युरोपीयन संसदेत उपस्थित प्रतिनिधींनी टाळ्या वाजवून झेलेन्स्की यांच्या विधानाचे समर्थन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झेलेन्स्की पुढे म्हणाले की, 'रशियाचा खार्किववर बॉम्बहल्ला हा युद्ध गुन्हा आहे. रशियाने येथे क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. या क्षेपणास्त्र हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला. युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यात आतापर्यंत 16 शाळकरी मुले मारली गेली आहेत.'


EU ने सिद्ध केले आहे की आपण युक्रेनसोबत आहात - Zelensky


'या हल्ल्याची किंमत आमचे नागरिक चुकवत आहेत, असे झेलेन्स्की म्हणाले. आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत.' झेलेन्स्कीने ईयूला सांगितले की, तुम्ही युक्रेनसोबत असल्याचे सिद्ध केले आहे.


'आम्हाला कोणीही तोडू शकत नाही'


झेलेन्स्की म्हणाले, आम्ही आमच्या देशासाठी लढत आहोत. आमची शहरे बंद आहेत, तरीही आम्ही मुक्त आहोत. आम्हाला कोणीही तोडणार नाही, आम्ही बलवान आहोत, आम्ही युक्रेनियन आहोत.'